IND vs ENG, Playing 11 : किंग इज बॅक! दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली पुन्हा संघात, 'या' खेळाडूचा पत्ता कट
IND vs ENG : भारताने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारताने अंतिम 11 मध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे.
India vs England Playing 11 : इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताने नुकताच आपला संघ जाहीर केला आहे. यावेळी भारताने संघात केवळ एक पण महत्त्वपूर्ण बदल केला आहे. भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचं संघात पुनरागमन झालं आहे. पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे विराट खेळू शकला नव्हता, पण आता तो फिट असल्यामुळे पुन्हा संघात परतला आहे. यावेळी पहिल्या सामन्यात त्याच्या जागी संधी मिळालेल्या श्रेयस अय्यरला विश्रांती देण्यात आली आहे. विराटच्या पर येण्याने त्याचे चाहते आनंदी झाल्याचं दिसत आहे.
King is back for Team India. pic.twitter.com/Y028LnH4sA
— Johns. (@CricCrazyJohns) July 14, 2022
मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडला 10 विकेट्सने मात दिल्यानंतर आता भारत दुसऱ्या सामन्यात नुकतीच नाणफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लंडनच्या प्रसिद्ध अशा लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर हा दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने संघात एकही बदल केलेला नाही. दुसरीकडे भारताने विराट कोहलीला पुन्हा संघात घेतलं आहे. विशेष म्हणजे भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली जानेवारी 2020 नंतर पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात एकत्र खेळणार आहेत. तर नेमकी भारताची अंतिम 11 कशी आहे पाहूया...
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी
A look at our Playing XI for the 2nd ODI.
— BCCI (@BCCI) July 14, 2022
Virat Kohli back in the XI
Live - https://t.co/N4iVtxbfM7 #ENGvIND pic.twitter.com/yeJIf2xTvz
हे देखील वाचा-
- ENG vs IND, 2nd ODI, Toss Update : भारताला मालिकाविजयाची सुवर्णसंधी; नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय
- IND vs WI T20 Squad : वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय टी20 संघाची घोषणा, कोहली-बुमराह संघात नाही, कसा आहे संपूर्ण स्कॉड?
- ENG vs IND, 2nd ODI, Pitch Report : क्रिकेटच्या पंढरीत रंगणार दुसरा एकदिवसीय सामना; कशी असेल मैदानाची स्थिती, वाचा सविस्तर