ENG vs IND: 18 वर्षांपूर्वी एकाच मालिकेत दोघांना मिळाली संधी, एक अजूनही खेळतोय क्रिकेट अन् दुसरा बनलाय पंच!
भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यात गुरुवारी पडलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Denesh Karthik) आणि इंग्लंडचा एलेक्स व्हार्फ (Alex Wharf) आमने- सामने आले.
![ENG vs IND: 18 वर्षांपूर्वी एकाच मालिकेत दोघांना मिळाली संधी, एक अजूनही खेळतोय क्रिकेट अन् दुसरा बनलाय पंच! IND vs ENG 1st T20: Dinesh Karthik and Alex Wharf’s debut happened in the same series, now English cricketers came out as umpires ENG vs IND: 18 वर्षांपूर्वी एकाच मालिकेत दोघांना मिळाली संधी, एक अजूनही खेळतोय क्रिकेट अन् दुसरा बनलाय पंच!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/08/7138ad084569a5ce1b7a080fc6805d431657265911_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ENG vs IND: भारत आणि इंग्लंड (England vs India) यांच्यात गुरुवारी पडलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिक (Denesh Karthik) आणि इंग्लंडचा एलेक्स व्हार्फ (Alex Wharf) आमने- सामने आले. महत्वाचं म्हणजे, दिनेश कार्तिक आणि एलेक्स व्हार्फनं एकाच एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. एकेकाळी विरोधक म्हणून दिनेश कार्तिकच्या समोर आलेल्या एलेक्स व्हार्फ गुरुवारी पुन्हा त्याच्या समोर आला. परंतु, त्याची भूमिका बदलली होती. तो इंग्लंडविरुद्ध टी-20 सामन्यात पंच म्हणून दिनेश कार्तिकच्या समोर आला.
दिनेश कार्तिकनं 5 सप्टेंबर 2004 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केलं होतं. याच मालिकेतील पहिल्या सामन्यात म्हणजेच 1 सप्टेंबर 2004 ला एलेक्स व्हार्फनं इंग्लंडच्या संघात एन्ट्री केली होती. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दिनेश कार्तिक आणि एलेक्स व्हार्फ पहिल्यांदा आमने- सामने आले होते. मात्र, दिनेश कार्तिक भारतीय संघाचा भाग आहे. तर, एलेक्स पंच म्हणून कार्यरत आहे.
एलेक्स व्हार्फचं आंतरराष्ट्रीय कारकीर्द वर्षभरातचं संपुष्टात
दिनेश कार्तिकची आंतरराष्ट्रीय कारकीर्द दीर्घकाळ चालली. या कालावधीत तो अनेकदा संघातून आत बाहेर झाला. दरम्यान, आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दिनेश कार्तिकनं धमाकेदार कामगिरी करून संघात पुनरागमन केलंय. दुसरीकडं एलेक्स व्हार्फला आपल्या क्रिकेट कारकिर्दीत काही खास कामगिरी करता आली नाही. ज्यामुळं त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द एक वर्षही टिकली नाही. त्यानं सप्टेंबर 2004 मध्ये इंग्लंडच्या संघात पदार्पण केलं होतं आणि ब्रुवारी 2005 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.कार्तिक आणि एलेक्सच्या वयातही 10 वर्षांचा फरक आहे. कार्तिक 37 तर एलेक्स 47 वर्षांचा आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)