एक्स्प्लोर

IND vs BAN 1st Test Day 2: भारत मजबूत स्थितीत, दुसऱ्या दिवसाखेर बांगलादेशची धावसंख्या 133/8

IND vs BAN LIVE UPDATES: भारत आणि बांगलादेश यांच्यात चट्टोग्रामच्याझहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली.

LIVE

Key Events
IND vs BAN 1st Test Day 2: भारत मजबूत स्थितीत, दुसऱ्या दिवसाखेर बांगलादेशची धावसंख्या 133/8

Background

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं पहिल्या दिवसाखेर 6 विकेट्सच्या मोबदल्यात 278 धावा केल्या. पहिल्या दिवशी बांगलादेशच्या संघानं चांगली गोलंदाजी केली. 

भारताचा पहिला डाव
नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार केएल राहुल (22 धावा) आणि शुभमन गिल (20 धावा) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर विराट कोहलीही अवघ्या एका धावेवर बाद झाला. भारतानं 48 धावांवर तीन विकेट्स गमावल्या. यानंतर चेतेश्वर पुजारानं संघाचा डाव सावरला.त्याला ऋषभ पंतचीही चांगली साथ मिळाली.भारताच्या डावातील 32 षटकात ऋषभ पंतच्या रुपात भारताला चौथा धक्का लागला. तो 46 धावा करून बाद झाला.त्यानतंर चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यरनं संघाची धावसंख्या पुढं नेली. अखेरच्या सत्रात तैजूल इस्लामनं चेतेश्वर पुजाराला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.चेतेश्वर पुजारानं 90 धावांची उत्कृष्ट खेळी केली. दरम्यान, पहिल्या दिवशीच्या अखेरच्या चेंडूवर मेहंदी हसननं अक्षर पटेलला बाद केलं. श्रेयस अय्यर नाबाद 82 धावांसह क्रिजवर उभा आहे. पहिल्या दिवसाखेर भारतानं 6 विकेट्सच्या मोबदल्यात धाव फलकावर 278 धावा लावल्या आहेत. बांगलादेशकडून तैजूल इस्लामनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, मेहंदी हसननं दोन विकेट्स घेतल्या.याशिवाय, खालीद अहमदच्या खात्यात एक विकेट जमा झाली.

कधी, कुठं पाहायचा सामना?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना 14-18 डिसेंबर दरम्यान रोजी खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी 9. 30 वा सामन्याला सुरूवात होईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे.  हा बांगलादेशच्या चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच सोनी लिव (Sony Liv) अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे प्रत्येक लाईव्ह अपडेट्स पाहता येतील.  

बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघात अनेक बदल
भारत आणि बांगलादेश यांच्यात येत्या 14 डिसेंबरपासून दोन सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आलाय. कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळं पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडलाय. या सामन्यात केएल राहुलकडं नेतृत्व सोपवण्यात आलंय. याशिवाय, मोहम्मद शामी , रवींद्र जाडेजा मालिकेतून बाहेर पडलाय. त्यांच्याऐवजी नवदीप सैनी आणि सौरभ कुमारला संघात स्थान देण्यात आलंय. बीसीसीआयच्या निवड समितीनं वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचाही कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात समावेश केलाय.

भारत-बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेचं वेळापत्रक
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 14 ते 18 डिसेंबर दरम्यान झहूर अहमद चौधरी स्टेडियम येथे खेळवली जाणार आहे. तर दुसरी आणि अंतिम कसोटी 22 ते 26 डिसेंबर दरम्यान ढाका येथील मीरपूर येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवली जाईल. या स्टेडियममध्ये तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचे सामने खेळले गेले होते, ज्यामध्ये भारताला 2-1 नं पराभवाचा सामना करावा लागला.

बांगलादेशची प्लेईंग इलेव्हन:
झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम, यासिर अली, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, इबादोत हुसेन.

भारताची प्लेईंग इलेव्हन:
शुभमन गिल, केएल राहुल (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

हे देखील वाचा-

10:31 AM (IST)  •  16 Dec 2022

भारत vs बांगलादेश, तिसरा दिवस: भारत (दुसरा डाव) - 16/0 रन (7.2 ओवर)

गोलंदाज : तैजुल इस्लाम | फलंदाज: शुभमन गिल कोणताही धाव नाही । तैजुल इस्लाम चा आणखी एक निर्धाव चेंडू.
10:31 AM (IST)  •  16 Dec 2022

भारत vs बांगलादेश, तिसरा दिवस: भारत (दुसरा डाव) - 16/0 रन (7.1 ओवर)

निर्धाव चेंडू ! कोणताही धाव नाही, भारत ची एकूण धावसंख्या 16 झाली.
10:30 AM (IST)  •  16 Dec 2022

भारत vs बांगलादेश, तिसरा दिवस: भारत (दुसरा डाव) - 16/0 रन (6.6 ओवर)

निर्धाव चेंडू. सय्यद खालिद अहमदच्या सहाव्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
10:29 AM (IST)  •  16 Dec 2022

भारत vs बांगलादेश, तिसरा दिवस: भारत (दुसरा डाव) - 16/0 रन (6.5 ओवर)

निर्धाव चेंडू ! कोणताही धाव नाही, भारत ची एकूण धावसंख्या 16 झाली.
10:29 AM (IST)  •  16 Dec 2022

भारत vs बांगलादेश, तिसरा दिवस: भारत (दुसरा डाव) - 16/0 रन (6.4 ओवर)

निर्धाव चेंडू ! कोणताही धाव नाही, भारत ची एकूण धावसंख्या 16 झाली.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Embed widget