एक्स्प्लोर

Ind vs Ban: भारत-बांगलादेश सामन्यात बीसीसीआयने केली मोठी चूक; एका खेळाडूच्या नावावरून प्रचंड गदारोळ

 India vs Bangladesh T20: या सामन्यात अर्शदीप सिंगला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला.

 India vs Bangladesh T20: भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यात तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी अघाडी घेतली आहे. या सामन्यात अर्शदीप सिंगला सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. अर्शदीप सिंगने 3 विकेट्स पटकावल्या.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात (Ind vs Ban) भारताकडून वेगवान गोलंदाज मयंक यादव आणि अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण केले. पदार्पणाच्या या सामन्यात मयंक यादवने उत्कृष्ट गोलंदाजी करत पहिलेच षटक निर्धाव टाकले. तसेच सामन्यात 1 विकेट्स देखील घेतली.  तर नितीश कुमार रेड्डीने 16 धावा केल्या.  सामन्यात नितीश कुमार रेड्डीच्या नावावरुन गदारोळ उडाल्याचं दिसून आलं.

नितीश रेड्डीच्या नावाशी संबंधित एक नवीन प्रकरण समोर आले आहे. नितीश रेड्डी यांनी प्रथम गोलंदाजी करत 2 षटकात 17 धावा दिल्या मात्र त्यांना एकही बळी घेता आला नाही. फलंदाजीत तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला, जिथे त्याने 15 चेंडूत 16 नाबाद धावा केल्या. नितीशने दमदार षटकारही मारला, पण तो चर्चेत आला आहे कारण त्याच्या जर्सीवर नितीश नव्हे तर 'नितेश' असे लिहिले आहे. 

बीसीसीआयने मोठी चूक केली का?

भारतीय क्रिकेटपटूचे अधिकृत नाव नितीश आहे, परंतु जर्सीवर 'नितेश' लिहिलेले आहे ही बीसीसीआयच्या लॉजिस्टिक टीमने केलेली मोठी चूक असावी. सध्या Addidas कंपनी भारतीय क्रिकेट संघाचे किट आणि जर्सी बनवते आणि नितीशचे नाव 'नितेश' असे लिहिण्यात उत्पादक कंपनीचीही चूक आहे.

कोण आहे नितीश कुमार रेड्डी?

नितीश कुमार रेड्डीच्या जर्सीमध्ये चूक झाली असली तरी आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यातील कामगिरीमुळे तो खूश असेल. नितीश रेड्डीने आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी 303 धावा केल्या आणि 3 विकेट्सही घेतल्या. जर सनरायझर्स हैदराबादला नितीश कुमार रेड्डीला आयपीएल 2025 साठी संघात कायम ठेवायचे असेल तर फ्रँचायझीला किमान 11 कोटी रुपये द्यावे लागतील. याशिवाय हैदराबाद राईट टू मॅच (RTM) कार्डद्वारे नितीश कुमार रेड्डीला कायम ठेवू शकते.

पहिला टी-20 सामना कसा राहिला?

एकतर्फी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात विश्वविजेत्या भारतीय संघाने बांगलादेशचा 7 गड्यांनी सहज धुव्वा उडवला. या दमदार विजयासह भारताने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. बांगलादेशला 19.5 षटकांत 127 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने 11.5 षटकांमध्येच 3 बाद 132 धावा केल्या. जुलै 2024 पासून भारताचा हा सलग आठवा आंतरराष्ट्रीय टी-20 विजय ठरला.

संबंधित बातमी:

Mayank Yadav : मयंक यादवची पहिल्याच सामन्यात झापूक झुपूक बॉलिंग, 150च्या स्पीडने मारा, अनेक विक्रम नावावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? अंबादास दानवेंची सावध प्रतिक्रिया; म्हणाले, महाविकास आघाडीत...
विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? अंबादास दानवेंची सावध प्रतिक्रिया; म्हणाले, महाविकास आघाडीत...
Maharashtra Cabinet Expansion: शिवसेना फुटली, छगन भुजबळांचं बंड अन्...; 1991 मध्ये नागपुरात झालेल्या शपथविधीचा इतिहास, 33 वर्षांनंतर आज पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार
शिवसेना फुटली, छगन भुजबळांचं बंड अन्...; 1991 मध्ये नागपुरात झालेल्या शपथविधीचा इतिहास, 33 वर्षांनंतर आज पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार
Ind vs Aus 3rd Test : DSP सिराजच्या 'ट्रिक'मध्ये लॅबुशेन फसला; नितीश रेड्डीचा बॉल अन् कोहलीचा 'तो' कॅच, जाळ्यात कसं अडकवलं, VIDEO
DSP सिराजच्या 'ट्रिक'मध्ये लॅबुशेन फसला; नितीश रेड्डीचा बॉल अन् कोहलीचा 'तो' कॅच, जाळ्यात कसं अडकवलं, VIDEO
16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wind Power : धाराशिवमधील मेसाई जळगावात पवन चक्की ठेकेदारांची दहशतDevendra Fadnavis Nagpur : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरातTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 15 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7AM : 15 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? अंबादास दानवेंची सावध प्रतिक्रिया; म्हणाले, महाविकास आघाडीत...
विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? अंबादास दानवेंची सावध प्रतिक्रिया; म्हणाले, महाविकास आघाडीत...
Maharashtra Cabinet Expansion: शिवसेना फुटली, छगन भुजबळांचं बंड अन्...; 1991 मध्ये नागपुरात झालेल्या शपथविधीचा इतिहास, 33 वर्षांनंतर आज पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार
शिवसेना फुटली, छगन भुजबळांचं बंड अन्...; 1991 मध्ये नागपुरात झालेल्या शपथविधीचा इतिहास, 33 वर्षांनंतर आज पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार
Ind vs Aus 3rd Test : DSP सिराजच्या 'ट्रिक'मध्ये लॅबुशेन फसला; नितीश रेड्डीचा बॉल अन् कोहलीचा 'तो' कॅच, जाळ्यात कसं अडकवलं, VIDEO
DSP सिराजच्या 'ट्रिक'मध्ये लॅबुशेन फसला; नितीश रेड्डीचा बॉल अन् कोहलीचा 'तो' कॅच, जाळ्यात कसं अडकवलं, VIDEO
16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
16-17 स्कॉर्पियो आल्या, 40-50 गुंड उतरले, पवनचक्की गुंड गावकऱ्यांना धमकवत सूटले, बीडनंतर धाराशिवमध्ये संतापजनक घटना
Maharashtra weather Update: झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
झटपट शेकोट्या पेटवा! राज्यात बोचरी थंडी, गार वाऱ्यांनी तापमान घटलं, पुढील 3 दिवस काय स्टेटस? वाचा IMD चा अंदाज
Abdus Salam : पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
पाकिस्तानमध्ये अपमान पण अलिगड विद्यापीठात सन्मान, पाकिस्तानच्या पहिल्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाचा पुरस्कार भारतातील लायब्ररीमध्ये 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
अतिइंग्रजीचं प्रेम मातृभाषेच्या जीवावर, मुलं मराठी शाळेत घाला, माझा कट्ट्यावर भालचंद्र नेमाडेंनी मांडली रोखठोक भूमिका 
EPFO: पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
पीएफ खात्यातील किती टक्के रक्कम ATM कार्डद्वारे काढता येणार? किती पगारावर किती रुपये मिळणार?  
Embed widget