Team India : दुलिप ट्रॉफीत विकेटचा पाऊस पाडला, युवा गोलंदाजाची भारतीय संघात निवड, आता बांगलादेश विरुद्ध मैदान गाजवाणार
IND vs BAN : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दो सामन्यांची कसोटी मालिका लवकरच सुरु होणार आहे. बीसीसीआयनं पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे.
नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेनंतर तीन टी 20 सामन्यांची मालिका पार पडेल. बांगलादेशनं पाकिस्तानला त्यांच्या होम ग्राऊंडवर लोळवलं आहे. आता ते भारताविरुद्ध लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. या मालिकेतील पहिल्या कसोटीसाठी बीसीसीआयनं 16 सदस्यांच्या भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. याचवेळी भारतात देशांतर्गत क्रिकेटमध्ये महत्त्व असणारा दुलिप करंडक सुरु आहे. यामध्ये भारताचे क्रिकेटपटू खेळत आहेत. दुलिप करंडकमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या आकाश दीपला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. त्यानं एका सामन्यात 9 विकेट घेतल्या असून त्यामुळं त्याला भारतीय संघाची दारं पुन्हा उघडली आहेत.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिली कसोटी 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. बीसीसीआयनं रविवारी रात्री पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर केला. विराट कोहली, रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांनी पुनरागमन केलं आह दुलिप करंडक गाजवणाऱ्या आकाश दीपला देखील निवड समितीनं संधी दिली आहे. भारत अ संघाकडून खेळताना आकाश दीपनं या सामन्यात 9 विकेट घेत खळबळ उडवून दिली होती.
भारतासाठी आकाश दीपनं आतापर्यंत केवळ एख कसोटी सामना खेळला आहे. दुलिप करंडक स्पर्धेतील सामन्यात भारत अ संघाकडून खेळताना त्यानं पहिल्या डावात भारत ब संघाच्या 4 विकेट घेतल्या. तर, दुसऱ्या डावात 5 विकेट घेतल्या. आकाश दीपनं सामन्यात 9 विकेट घेतल्या. मात्र तो भारत अ संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. भारत ब विरुद्ध आकाश दीपचा संघ पराभूत झाला असला तरी बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेत त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. आकाश दीपला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. अकरा जणांच्या संघात त्याला स्थान मिळतं का हे पाहावं लागेल.
भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल , शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. तर, बांगलादेशनं पाकिस्तानला पराभूत करत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. भारतीय संघाला पहिलं स्थान कायम ठेवायचं असल्यास बांगलादेशला पराभूत करणं आवश्यक आहे.
इतर बातम्या :