IND vs BAN: ईशान किशन, विराट कोहलीचा धुमधडाका; भारताचं बांगलादेशसमोर 410 धावांचं आव्हान
IND vs BAN 3rd ODI: या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
IND vs BAN 3rd ODI: ईशान किशनचं (Ishan Kishan) द्विशतक आणि विराटच्या (Virat Kohli) शतकी खेळीच्या जोरावर भारतानं बांगलादेशसमोर (India vs Bangladesh) 410 धावांचं लक्ष्य ठेवलं. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ईशान किशन आणि विराट कोहलीनं बांगलादेशचा कर्णधार लिटन दासचा हा निर्णय अयोग्य ठरवला. या सामन्यात ईशान किशननं 210 आणि विराटनं 113 धावांचं योगदान देत भारताची धावसंख्या 400 पार पोहचवण्यात मदत केली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. भारताला 4.1 षटकात सलामीवीर शिखर धवनच्या रुपात पहिला धक्का लागला. मात्र, त्यानंतर ईशान किशन आणि विराट कोहलीनं भारताचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी मोठी भागिदारी रचत भारताची धावसंख्या 300 पार पोहचवण्यात मदत केली. भारताच्या डावातील 36 षटकातील अखेरच्या चेंडूवर ईशान किशन आऊट झाला. एका बाजूनं पाठोपाठ विकेट पडत असताना विराट कोहलीनं संघाची दुसरी बाजू संभाळून ठेवली. या सामन्यात श्रेयस अय्यर (3 धावा) आणि कर्णधार केएल राहुल (8 धाव करून बाद झाला. त्यानंतर 41व्या षटकात विराट कोहलीदेखील शाकीब अल हसनच्या गोलंदाजीचा शिकार झाला. भारतानं निर्धारित 50 षटकात 8 विकेट गमावून बांगलादेशसमोर 410 धावांचं लक्ष्य ठेवलं. बांगलादेशकडून तस्कीन अहमद, हुसेन आणि शाकीब अल हसननं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, मुस्ताफिजुर रहमान आणि मेहंदी हसनच्या खात्यात एक-एक विकेट जमा झाली.
ट्वीट-
That's a brilliant 100-run partnership between @ishankishan51 & @imVkohli 👌💪#TeamIndia 116/1
— BCCI (@BCCI) December 10, 2022
Live - https://t.co/ZJFNuacDrS #BANvIND pic.twitter.com/MkVYINemB7
भारताची प्लेईंग इलेव्हन:
शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/ विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक
बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन:
अनामूल हक, लिटन दास (कर्णधार), यासिर अली, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), महमुदुल्ला, अफिफ हुसैन, मेहिदी हसन मिराझ, इबादोत हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद
हे देखील वाचा-