स्मिथ-हेड जोडीने टीम इंडियाचे टेन्शन वाढवले, पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
IND vs AUS, WTC Final 2023: जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं.
IND vs AUS, WTC Final 2023: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु आहे. ट्रेविस हेड आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व मिळवलेय. स्मिथ-हेड या जोडीने द्विशतकी भागिदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. तीन विकेट झटपट गेल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ बॅकफूटवर गेला होता. पण स्मिथ आणि हेड यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 300 पार नेला. ट्रेविस हेड याने शानदार शतक झळकावलेय तर स्मिथ याने शतकाकडे वाटचाल केली आहे. सिराज, शमी आणि शार्दूल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. पहिल्या दिवसा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने तीन विकेटच्या मोबदल्यात 327 धावा केल्या आहेत. शतकवीर ट्रेविस हेड 146 तर स्मिथ 95 धावांवर खेळत आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेकीचा कौल जिंकला पण आजच्या दिवसाचा खेळात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला तीन धक्के दिले. पण त्यानंतर स्मिथ आणि हेड यांनी भारताची डोकेदुखी वाढवली. चौथ्या विकेटसाठी 251 धावांची भागिदारी केली. हेड याने 156 चेंडूत नाबाद 146 धावांवर खेळ आहे. यामध्ये 22 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. तर स्मिथ याने 227 चेंडूचा सामना करताना संयमी 95 धावांवर खेळत आहे.
Stumps on the opening day of #WTC23 Final!
— BCCI (@BCCI) June 7, 2023
Australia ended Day 1 at 327/3.
See you tomorrow for Day 2 action.
Scorecard ▶️ https://t.co/0nYl21pwaw#TeamIndia pic.twitter.com/G0Lbyt17Bm
जागतिक कसोटी विजेतेपदाच्या फायनलच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. लंडनच्या ओव्हल मैदानातल्या या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं होतं. त्याचा पुरेपूर लाभ उठवून ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर तीन बाद ३२७ धावांची मजल मारली. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 251 धावांची अभेद्य भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाला भक्कम स्थितीत नेलं. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, त्यावेळी ट्रॅव्हिस हेड 146 धावांवर आणि स्टीव्ह स्मिथ 95 धावांवर खेळत होता. भारताकडून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूरनं प्रत्येकी एक विकेट घेतली. सुरुवातीला डेविड वॉर्नर याने 43 धावांची झटपट खेळी केली. पण दुसऱ्या बाजूला तीन विकेट झटपट गेल्या. उस्मान ख्वाजा याला सिराजने खातेही उघडू दिले नाही. तर मोहम्मद शणी याने मार्नस लाबूशेन याला तंबूचा रस्ता दाखवला. लाबूशेन याने 26 धावांची खेळी केली. डेविड वॉर्नर याचा अडथळा लॉर्ड शार्दूल ठाकूर याने बाद केले.