एक्स्प्लोर

IND vs AUS U19 Final : भारत ऑस्ट्रेलियाशी पुन्हा एका वर्ल्डकप फायनलमध्ये भिडणार, 'उदय ब्रिगेड'कडे जुना वचपा काढण्याची संधी

IND vs AUS U19 Final : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (IND vs AUS) पुन्हा एकदा वर्ल्डकपचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 (U19 World Cup) संघांनी फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे भारताच्या 'उदय ब्रिगेड'कडे जुना वचपा काढण्याची संधी आली आहे. हा सामना रविवारी (दि.11) बनोनीच्या विलमूर पार्कवर खेळवण्यात येणार आहे

IND vs AUS U19 Final : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (IND vs AUS) पुन्हा एकदा वर्ल्डकपचा अंतिम सामना रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 (U19 World Cup) संघांनी फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे भारताच्या 'उदय ब्रिगेड'कडे जुना वचपा काढण्याची संधी आली आहे. हा सामना रविवारी (दि.11) बनोनीच्या विलमूर पार्कवर खेळवण्यात येणार आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेचा 2 विकेट्सने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली होती. तर ऑस्ट्रेलियाने उपांत्यफेरीत पाकिस्तानचा 1 गडी राखत पराभव केला होता. 

एका वर्षांत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा फायनल सामना 

या वर्षात भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान हा तिसरा फायनल सामना खेळवला जाणार आहे. यापूर्वी खेळवण्यात आलेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 7 ते 11 जुलै दरम्यान लंडन येथील ओवलच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यातही ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 209 धावांनी धु्व्वा उडवला होता. 

View this post on Instagram
 
A post shared by ICC (@icc)

ऑस्ट्रेलियाकडून 2023 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभव 

दरम्यान, त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया 2023 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा आमने-सामने आली. मात्र, या सामन्यातही कांगारुंनी भारताचा 6 गडी राखून पराभव केलाय. या पराभवाने तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे टीम इंडियाचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. पराभव झाल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंच्या सर्व खेळाडूंच्या डोळ्यांत अश्रू पाहायला मिळाले. या सर्वांचा वचपा काढण्याची संधी टीम इंडियाच्या उदय ब्रिगेडकडे आली आहे. 

फायनलमध्ये भारताचे पारडे जड

अंडर 19 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दोनदा आमने-सामने आले आहेत. या दोन्ही वेळेस भारताने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवलाय. आता तिसऱ्यांदा दोन्ही संघ आमने सामने असणार आहेत. यापूर्वी भारताने 2018 आणि 2012 मध्ये अंडर 19 वर्ल्डकपवर नाव कोरले होते.

अंडर 19 च्या वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी टीम 

टीम इंडिया ही अंडर 19 च्या वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी टीम आहे. 2008, 2000, 2012, 2018,2022 अशा पाच वेळेस टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरले. तर भारतीय संघ 2016 आणि 2020 मध्ये उपविजेताही ठरला होता. भारताची नजर आता सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरण्याकडे आहे. 
 
इतर महत्वाच्या बातम्या 

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; जाडेजा, राहुलची वापसी, विराट कोहली मात्र...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget