IND vs AUS : भाई जलवा हैं हमारा.... भारत 3-0 ने हरला तरी एका पठ्ठ्यामुळे ऑस्ट्रेलियाचे धाबे का दणाणलेत?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरला पर्थमध्ये खेळला जाणार आहे.
India vs Australia Test Series 2024-25 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरला पर्थमध्ये खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघही जाहीर करण्यात आला आहे. भारतीय संघ 10 आणि 11 नोव्हेंबरला दोन बॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. टीम इंडियाला नुकतेच न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाच्या फलंदाजांनी न्यूझीलंडविरुद्ध अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. मात्र पराभवानंतरही, एक खेळाडूच्या फॉर्ममुळे ऑस्ट्रेलियाचे धाबे दणाणले आहे.
या खेळाडूचा फॉर्म पाहता ऑस्ट्रेलियन संघ काही खास योजना आखत असेल. हा खेळाडू दुसरा कोणी नसून टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आहे. ऋषभ पंतने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दीर्घ विश्रांतीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याने अशा पद्धतीने पुनरागमन केले की जणू त्याने कधीच ब्रेक घेतला नव्हता. पुनरागमनानंतर त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही कहर केला.
पुनरागमनानंतर पंतची कशी होती कामगिरी?
ऋषभ पंतने पुनरागमन केल्यानंतर 05 कसोटी सामने खेळले आहेत. या पाच सामन्यांच्या 10 डावांमध्ये ऋषभ पंतने 46.89 च्या सरासरीने आणि 86.48 च्या स्ट्राइक रेटने 422 धावा केल्या आहेत. या काळात पंतच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतकं आहेत. तो देखील एकदा 99 धावांवर बाद झाला आहे. ऋषभला ऑस्ट्रेलियातही आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवायचा आहे. जिथे टीम इंडियासाठी विजय आवश्यक आहे. ऋषभ पंतने शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा केला तेव्हा त्याने कांगारूंमध्ये नाव कमावले होते. गब्बा येथील ऐतिहासिक विजयात ऋषभ पंतची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. ऑस्ट्रेलियात ऋषभ पंतने 7 कसोटी सामन्यांच्या 12 डावात 62.40 च्या सरासरीने 624 धावा केल्या आहेत.
अलीकडेच, टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने संघाची कमान ऋषभ पंतकडे सोपवली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. मोहम्मद कैफ म्हणाला की, सध्याच्या संघातून फक्त ऋषभ पंतच कसोटी कर्णधारपदाचा मोठा दावेदार आहे. पंत जेव्हाही खेळतो तेव्हा तो टीम इंडियाला फ्रंट फूटवर ठेवतो. पंत कितीही नंबरवर आला तरी तो नेहमीच मॅच विनिंग इनिंग खेळण्याचा प्रयत्न करतो. पंतमध्ये सर्व प्रकारच्या परिस्थितीत धावा करण्याची क्षमता आहे. पंतने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत धावा केल्या आहेत. भारताच्या टर्निंग पिचवरही त्याने धावा केल्या आहेत.
हे ही वाचा -