VIDEO : धोनीकडून रिंकू शिकला फिनिशिंगची कला? पाहा काय म्हणाला युवा खेळाडू
Rinku Singh India vs Australia : पहिल्या टी 20 सामन्यात रिंकू सिंह याने शानदार फिनिशिंग करत भारताला अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून दिला.

Rinku Singh India vs Australia : पहिल्या टी 20 सामन्यात रिंकू सिंह याने शानदार फिनिशिंग करत भारताला अखेरच्या चेंडूवर विजय मिळवून दिला. विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात रिंकूने शानदार कामगिरी केली. सूर्या आणि ईशान किशन यांनी शानदार अर्धशतके ठोकली, पण त्यानंतर भारताची फलंदाजी ढेपाळली. पण अखेरीस रिंकू सिंह याने शानदार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज असताना रिंकूने षटकार मारत विजय मिळवून दिला.
पहिल्या टी 20 सामन्यानंतर रिंकूने आपल्या विस्फोटक खेळीवर प्रतिक्रिया दिली. रिंकू सिंहने दबावाची परिस्थिती कशी हाताळली, याबाबत सांगितले. महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीबाबत काय सल्ला दिला होता, हे त्याने सांगितले. बीसीसीआयने याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामुळे रिंकू फिनिशिंगबद्दल बोलत आहे. तो म्हणाला, ‘‘आम्ही सामना जिंकला हे चांगले झाले. मी जेव्हा फलंदाजीला गेलो तेव्हा परिस्थिती माझ्यासाठी योग्य होती. मी नेहमी जे केले ते मला करावे लागले.''
रिंकू सिंहने धोनीचा उल्लेख करत म्हणाला की, ''माही भाई (महेंद्र सिंह धोनी) सोबत एक-दोन वेळा चर्चा झाली. तुम्ही जितके शांत राहाल आणि जितके सरळ सरळ मारण्याचा प्रयत्न कराल तितके चांगले होईल, असे माही भाईने मला सांगितले. मी तेच करण्याचा प्रयत्न करतो. मी शांत राहतो. कोणताही रिअॅक्शन देत नाही. याचा मला खूप फायदा झाला.''
The MSD touch 🧊 behind Rinku Singh's ice cool finish 💥
— BCCI (@BCCI) November 24, 2023
Do not miss the 𝙍𝙞𝙣𝙠𝙪 𝙍𝙚𝙘𝙖𝙥 that includes a perfect GIF describing #TeamIndia's win 😉
WATCH 🎥🔽 - By @28anand | #INDvAUShttps://t.co/MbyHYkiCco
सूर्याचे वादळ, रिंकूचा फिनिशिंग टच -
अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांचे आव्हान भारताने अखेरच्या चेंडूवर दोन विकेट राखून पूर्ण केले. फिनिशर रिंकूने षटकार ठोकत भारताला विजयी केले. त्याआधी सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी झंझावती अर्धशतके ठोकली. ऑस्ट्रेलियाकडून तनवीर संघा याने दोन विकेट घेतल्या. जोश इंग्लिंश याने ठोकलेल्या झंझावती शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 208 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल भारताने हे आव्हान दोन विकेट राखून सहज पार केले.
सूर्या आणि ईशान किशन बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी ढेपाळली. एकापाठोपाठ एक विकेट गेल्या. तिलक वर्मा 12 धावा काढून बाद झाला. अक्षर पटेल दोन धावांचे योगदान देऊ शकला. रवि बिश्नोई आणि अर्शदीप यांना खातेही उघडता आले नाही. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला रिंकू याने फिनिशिंग केले. अखेरच्या षटकात भारताने तीन विकेट्स गमावल्या. पण रिंकून हार मानली नाही. रिंकून षटकार मारुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रिंकूने 14 चेंडूत 22 धावांची खेळी केली.




















