एक्स्प्लोर

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी आज टीम इंडियाची निवड, कुणाला मिळणार संधी?

IND vs AUS ODI series : विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. तीन सामन्याच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची रविवारी घोषणा झाली.

India's squad for the Australian ODI series : विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर येत आहे. तीन सामन्याच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची रविवारी घोषणा झाली. आज भारतीय संघाची निवड होणार आहे.  रात्री साडेआठ वाजता कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधातील वनडे मालिका सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यासाठी अग्निपरीक्षा असेल. कारण, आशिया चषकात दोघांनाही तितकी संधी मिळालेली नव्हती. त्यामुळे विश्वचषकाआधी ही दोन्ही खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिका महत्वाची आहे. दोन्ही संघाना खेळण्यासाठी अखेरचे तीन सामने असतील. त्यानंतर विश्वचषकाचा थरार सुरु होणार आहे. 

वनडे विश्वचषकाला पाच ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. त्याशिवाय दोन सराव सामने असतील. त्यामुळे विश्वचषकाआधी संघ नियोजन करण्यासाठी फक्त पाच सामन्याचा कालावधी असेल. ऑस्ट्रेलियाविरोधात टीम इंडियाच्या काही सिनिअर खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो. विश्वचषकात खेळणाऱ्या बॅकअप खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी साडेआठ वाजता रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांची पत्रकार परिषद आहे. त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

सततच्या दुखापतीमुळे अय्यरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याशिवाय सूर्यकुमार यादव याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. वारंवार संधी दिल्यानंतरही सूर्याला मोठी खेळी करता आली नाही.  सूर्या आणि श्रेयस यांच्यासाठी ही मालिका महत्वाची असेल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचं वेळापत्रक -

आशिया चषकानंतर टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे.  पहिला एकदिवसीय सामना २२ सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे. त्यानंतर २४ आणि २७ सप्टेंबर रोजी इंदौ आणि राजकोट येथे लढत होणार आहे. विश्वचषकाच्या आधी होणारी ही वनडे मालिका तयारीसाठी महत्वाची आहे.

भारताविरोधात वनडे मालिकेसाठी  ऑस्ट्रेलियाची टीम:

पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जॉश इंग्लिश, स्पेंसर जॉनसन, मार्नश लाबुशेन, मिचल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जम्पा. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Kolhapur News : जोतिबा डोंगरावर भलामोठा दगड रस्त्यावर घसरला; यमाई मंदिराकडे जाताना दगड रस्त्यात
जोतिबा डोंगरावर भलामोठा दगड रस्त्यावर घसरला; यमाई मंदिराकडे जाताना दगड रस्त्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 03 जुलै 2024: ABP MajhaSensex Nifty : सेन्सेक्स , निफ्टी आजवरच्या सर्वोच्च पातळीवरABP Majha Headlines :  11:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut PC :  गांधींनी मोदींना लोकसभेत घाम फोडला मला बोलू दिलं नाही, माईक बंद केला- राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Kolhapur News : जोतिबा डोंगरावर भलामोठा दगड रस्त्यावर घसरला; यमाई मंदिराकडे जाताना दगड रस्त्यात
जोतिबा डोंगरावर भलामोठा दगड रस्त्यावर घसरला; यमाई मंदिराकडे जाताना दगड रस्त्यात
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
Beed News: परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी
परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Monalisa Net Worth : कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
Embed widget