(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS : कांगारुंविरोधात अशी असेल भारताची प्लेईंग 11, पाहा कुणाला मिळू शकते संधी?
India's Predicted Playing XI Vs Australia : विश्वचषकाआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात दोन हात करणार आहे.
India's Predicted Playing XI Vs Australia : विश्वचषकाआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात दोन हात करणार आहे. शुक्रवारी मोहालीच्या मैदानावर कांगारु आणि टीम इंडिया यांच्यामध्ये लढत होणार आहे. विश्वचषकाआधी होणारी ही मालिका दोन्ही संघासाठी महत्वाची असेल. विश्वचषकाच्या तयारीसाठी ही अखेरची संधी आहे, त्यामुळे दोन्ही संघ ताकदीने मैदानात उतरतील. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना आराम देण्यात आलाय. अशा स्थितीत केएल राहुल याच्याकडे संघाची धुरा देण्यात आलाय. अशा परिस्थितीत जे खेळाडू विश्वचषकात संघाचा भाग होऊ शकतात त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
टॉप ऑर्डरमध्ये कोण कोण ----
शुभमन गिलसह सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाड टॉप ऑर्डरमध्ये दिसू शकतो. चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी गायकवाड याची भारतीय क्रिकेट संघाची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. अशा स्थितीत त्यांच्या तयारीच्या दृष्टीने गायकवाडला संधी दिली जाऊ शकते. मात्र, आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये असेल. तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर खेळू शकतो. अय्यर आशिया कपमध्येही टीम इंडियाचा भाग होता. तो पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला. मात्र, त्यानंतर त्यांना पाठीच्या समस्या निर्माण झाल्या. मात्र आता तो पुन्हा एकदा परतला आहे. भारतीय संघातील त्याचे स्थान निश्चित मानले जातेय.
राहुल संभाळणार मध्यक्रम -
मधल्या फळीची सुरुवात इशान किशनपासून होऊ शकते. इशान चौथ्या क्रमांकावर खेळेल. त्यानंतर कर्णधार केएल राहुल स्वतः पाचव्या क्रमांकावर उतरेल. रविंद्र जाडेजा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. सातव्या क्रमांकावर सूर्या फलंदाजीला येईल. सूर्यकुमार यादव याच्याकडे फिनिशिंगची जबाबदारी देण्यात आली आहे.
गोलंदाजीत कोण कोण ?
आठव्या क्रमांकावर आर. अश्विन याचा क्रमांक लागेल. अश्विन फलंदाजीची ताकदही वाढवेल. त्यानंतर शार्दूल ठाकूर असेल.. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज दोन वेगवान गोलंदाज अतील. अश्विन, शार्दूल आणि जाडेजा हे तीन अष्टपैलू संघात असतील.
भारताची संभाव्य प्रेईंग 11
शुभमन गिल, ऋतुराज गाकयकवाड, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्याकुमार यादव, रविंद्र जाडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर.