(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Sharma PC: टॉस, पिच आणि प्लेईंग-11... रोहित शर्माच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
World Cup Final 2023 IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली विश्वचषकाची फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.
Rohit Sharma Press Conference: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधली विश्वचषकाची फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांमधल्या सलामीच्या लढाईनं विश्वचषकाच्या मोहिमेला पाच ऑक्टोबर रोजी याच स्टेडियममधून सुरुवात झाली होती. आणि आता विश्वचषक मोहिमेच्या सांगतेला भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या फौजा अहमदाबादच्या रणांगणात आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. वन डे क्रिकेटच्या इतिहासात भारतानं आजवर 1983 आणि 2011 साली विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. तसंच ऑस्ट्रेलियानं १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ साली विश्वचषकाचा मान मिळवला आहे. योगायोगाची बाब म्हणजे विश्वचषकाच्या महायुद्धात यंदा तब्बल वीस वर्षांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत पुन्हा निर्णायक लढाई होणार आहे. २००३ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर वीस वर्षांनी दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने उभे ठाकले आहेत. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने टॉस, प्लेइंग इलेव्हन, खेळपट्टी आणि परिस्थिती यासह अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले.
रोहित शर्माच्या पत्रकार परिषदेतील दहा मुद्दे -
फायनलसाठी प्लेईंग 11 कशी असेल... यावर बोलताना रोहित शर्माने नेहमीप्रमाणेच उत्तर दिले. तो म्हणाला की, सर्व 15 खेळाडूंकडे खेळण्याची संधी आहे. आज आणि उद्या खेळपट्टी पाहिल्यानंतर 12-13 खेळाडू निवडले जातील. पण प्लेईंग 11 अद्याप तयार नाही. सर्व 15 खेळाडू सामन्यासाठी तयार असावेत.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवर बोलातान रोहित शर्मा म्हणाला की.... भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या खेळपट्टीवर गवत नव्हते. पण फायनलसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवर थोड्याफार प्रमाणात गवत आहे. मी अद्याप खेळपट्टी पाहिलेली नाही. पण खेळपट्टी संथ असण्याची शक्यता आहे. उद्या खेळपट्टी पाहिल्यानंतर सर्व निर्णय घेतला जाईल. खेळाडूंना याबाबत कल्पना आहे.
फायनलसाठी नाणेफेक महत्वाची ठरणार नाही.. परिस्थितीनुसार आम्ही चांगले क्रिकेट खेळू
"फायनल मॅचसाठी कोणताही वेगळा संदेश मिळणार नाही. आम्हाला आमचं काम माहीत आहे आणि खेळाडूंनाही माहीत आहे की त्यांना काय करायचं आहे. यात काही विशेष होणार नाही. आम्ही आमची नेहमीची प्री-मॅच टीम डिशवॉश करू."
"विश्वचषक जिंकल्यास महत्वाचं होईल, पण आम्हाला जास्त उत्साही व्हायचे नाही. आम्हाला सध्या संतुलन हवे आहे."
उद्या जर तुम्ही चूक केली तर गेल्या 10 सामन्यांमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीने काही फरक पडत नाही. वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे किंवा भविष्याचा विचार करणे चांगले आहे. आम्हाला ऑस्ट्रेलियाची कमजोरी शोधून आपली ताकद वाढवायची आहे. 20 वर्षांपूर्वी काय झाले, याचा विचार करण्याची गरज नाही.
मोहम्मद शामीबद्दल रोहि म्हणाला की, संघात नसणे आणि नंतर परत येऊन अशी कामगिरी करणे सोपे नाही. जेव्हा तो खेळत नव्हता तेव्हा त्याने सिराज आणि शार्दुलला बेंचवरुन सतत मदत केली आहे.
भावनिकदृष्ट्या हा एक मोठा प्रसंग आहे. विश्वचषकाची फायनल आमच्यासाठी सर्वात मोठे स्वप्न आहे, परंतु प्रोफशनल खेळाडूंसाठी आम्हाला खेळायचा आहे. 11 खेळाडूंना मैदानात त्यांचे काम करायचे आहे. अशा परिस्थितीत शांत राहणे खूप महत्वाचे आहे.
विश्वचषकात आपल्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. पहिल्या 4-5 सामन्यांमध्ये आम्ही इतर संघांना 300 पेक्षा कमी धावांवर रोखले आहे. तिन्ही वेगवान गोलंदाजांना माहित आहे की त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, त्यांना त्यांचे काम कसे करायचे आहे हे माहित आहे. मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्यासाठी फिरकीपटू आले आणि विकेट्स घेतल्या. प्रत्येकाला आपला रोल माहित आहे.
फायनलसाठी महत्वाचं काय आहे? यावर लक्ष द्यायला हवं. त्यासाठी खूप वेळ दिलाय.. अन् लक्ष केंद्रीत केलेय. आतापर्यंत जी तयारी केली, त्यावरच कायम राहायला हवे. पहिल्या सामन्यापासूनच आम्ही त्यावर लक्ष केंद्रीत केलेय. फायनलमध्येही तसेच करु... भारतीय क्रिकेटर म्हणून नक्कीच दबाव असेल. खेळाडू म्हटले की, कौतुक टीका अन् दबाव या गोष्टी येतातच, असे रोहित शर्मा म्हणाला.