एक्स्प्लोर

IND vs AUS: कोहलीची खराब कामगिरी टीम इंडियाची चिंता वाढवणारी, मागील 10 डावात फारच खराब कामगिरी, वाचा सविस्तर

India vs Australia : इंदूरमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावातही विराट कोहली केवळ 13 धावा करुन बाद झाला आहे. पहिल्या डावातही त्याने 22 धावाच केल्या होत्या.

Virat Kohli in Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरु बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहली खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. इंदूरमध्ये खेळल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही कोहली खास कामगिरी करु शकलेला नाही.या सामन्याच्या दुसऱ्या डावात कोहली केवळ 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याआधीही पहिल्या डावात त्याने 22 धावाच केल्या होत्या. ज्यामुळे कोहली गेल्या अनेक दिवसांपासून कसोटी क्रिकेटमध्ये खराब फॉर्ममध्ये असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.शतक तर दूरच मागील बरेच डाव साधं अर्धशतकही त्याला ठोकता आलेलं नाही. अशा स्थितीत त्याचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

गेल्या 10 डावातील आकडेवारी खूपच खराब

कोहलीच्या शेवटच्या 10 कसोटी डावांबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने सर्वाधिक 44 धावा केल्या आहेत आणि उर्वरित 9 डावांमध्ये तो 30 धावांचा टप्पा देखील पार करू शकला नाही. मागील 10 कसोटी डावांमध्ये कोहलीने 20, 1, 19*, 24, 1, 12, 44, 20, 22 आणि 13 इतक्याच धावा केल्या आहेत. अर्धशतक ठोकूनही त्याला बरेच डाव उलटून गेले आहेत.

शेवटचे शतक 2019 मध्ये  

कोहलीने त्याचं शेवटचे कसोटी शतक 22 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध ईडन गार्डन्सवर झळकावलं होतं. त्या सामन्यात त्याने 18 चौकारांच्या मदतीने 136 धावांची खेळी केली. याशिवाय 2019 पासून त्याची कसोटी सरासरीही खूपच खराब आहे. कोहलीची 2020 मध्ये 19.33, 2021 मध्ये 28.21, 2022 मध्ये 26.50 आणि 2023 मध्ये 22.20 इतकी आहे. कोहलीचे हे सर्व आकडे हळूहळू संघासाठी चिंतेचा विषय बनत आहेत.

आंतरराष्ट्रीय कसोटी कारकीर्द  

कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 106 कसोटी, 271 एकदिवसीय आणि 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 8195 धावा, एकदिवसीय सामन्यात 12809 धावा आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 4008 धावा केल्या आहेत. कोहलीने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 74 शतके आणि 129 अर्धशतके केली आहेत.

आतापर्यंत काय-काय झालं?

सर्वात आधी नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पिच फिरकी गोलंदाजीसाठी अधिक फायदेशीर असल्याने प्रथम फलंदाजी घेणं भारताला तोट्याचं ठरलं. ऑस्ट्रेलियाच्या तीन फिरकीपटूंनी मिळून संपूर्ण भारतीय संघाला सर्वबाद केलं. एकही विकेट न गमावता 27 धावा केल्यानंतर भारतीय संघाने पुढील 18 धावांत 5 विकेट गमावल्या. ज्यानंतर पुढे कशातरी 100 पार धावा भारताने केल्या आणि 33.2 षटकांत 109  धावांवर भारताचा डाव आटोपला. यावेळी  मॅथ्यू कुहनेमनने फारच अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने पहिल्या चार षटकांतच टीम इंडियाला 3 धक्के देत एका डावात 5 विकेट्स घेण्याचा मान मिळवला. कुहनेमनने प्रथम कर्णधार रोहित शर्माला (12 धावा) यष्टिमागे झेलबाद केलं. त्यानंतर त्याच्या पुढच्याच षटकात सलामीवीर शुभमन गिलला (21 धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. श्रेयस अय्यरला (0) बोल्ड करुन अखेर अश्विन आणि उमेश यादव या अखेरच्या फळीतील महत्त्वाच्या विकेट्सहील त्याने घेतल्या. याशिवाय अनुभवी नॅथन लायनने चेतेश्वर पुजारा (1 धाव) आणि रवींद्र जाडेजा (4 धावा) आणि केएस भरत (17 धावा) या विकेट्स घेतल्या. तर मर्फीने विराटची (22 धावा) मोठी विकेट घेतली. मग ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात झाल्यावर त्यांनी सुरुवातीपासून चांगली फलंदाजी केली. सलामीवीर ट्रेविस हेड 9 धावांवर जाडेजाकडून बाद झाल्यावर ख्वाजा आणि लाबुशेननं डाव सावरला. पण या दोन्ही सेट फलंदाजांना आणि त्यानंतर कॅप्टन स्टीव्ह स्मिथलाही जाडेजानं आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत तंबूत धाडलं.दिवस संपताना जाडेजानं 24 षटकं टाकून 63 धावा देत 4 महत्त्वाचे विकेट्स घेतले होते. दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर ऑस्ट्रेलियानं आक्रमक फलंदाजी सुरु केली 156 वर डाव सुरु केल्यावर 186 धावांपर्यंत एकही विकेट पडली नाही. पण त्यानंतर आर अश्विन आणि उमेश यादव या जोडीने दमदार गोलंदाजी करत प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या आणि 186 वर पाचवी विकेट पडल्यावर 197 तर ऑस्ट्रेलिया सर्वबाद झाली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे 6 गडी केवळ 11 धावांमध्ये तंबूत परतले. ज्यानंतर आता 45 षटकानंतर भारताची स्थिती 132 वर 6 बाद अशी आहे.  

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
Embed widget