IND vs AUS : चेतेश्वर पुजाराचा खास सन्मान, 100 वी कसोटी खेळण्यासाठी मैदानात उतरताच संपूर्ण संघाकडून खास स्वागत, पाहा VIDEO
Cheteshwar Pujara : भारतीय संघ दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळत असून अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्या कारकिर्दीतील हा 100 वा कसोटी सामना आहे.
IND vs AUS 2nd Test : भारतीय संघाचा टेस्ट क्रिकेटमधील स्टार आणि अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्यासाठी आजचा दिवस अत्यंत खास असून तो आपला 100 वा कसोटी सामना खेळत आहे. दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याद्वारे तो कारकिर्दीतील 100वी कसोटी खेळणार आहे. दरम्यान सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी निवडल्यावर क्षेत्ररक्षणासाठी भारत मैदानात येताना पुजाराचं खास स्वागत संपूर्ण संघानं केल्याचं दिसून आलं.
यावेळी सर्व खेळाडूंनी पुजारा याला गार्ड ऑफ हूनर दिला. ज्यात सर्व खेळाडू दोन्ही बाजूंनी उभे राहिले होते आणि त्यांच्या मधून चेतेश्वर पुजाराने मैदानात एन्ट्री घेतली. सर्वजण यावेळी टाळ्यांच्या गजरात पुजाराचं स्वागत करताना दिसले. हा संपूर्ण व्हिडीओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
पाहा VIDEO-
View this post on Instagram
'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचं स्वप्न'
सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पुजाराने आपल्या खास स्वप्नाबद्दल सांगितलं, त्यावेळी तो म्हणाला की, त्याला भारतासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकायची आहे. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याच्या अगदी जवळ आहे. सध्याच्या कसोटी मालिकेत संघाला ऑस्ट्रेलियाला किमान 3-1 ने पराभूत करावे लागेल. भारतीय संघाने नागपुरातील पहिला सामना जिंकला आहे. याआधीही टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र, त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. पुजारा त्याच्या 100 व्या कसोटीबद्दल म्हणाला, “100 वा कसोटी सामना खेळण हे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचं आहे. यात माझ्या वडिलांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो सामना पाहण्यासाठी उद्या ते येथे येणार आहेत. मी सर्वांचा आभारी आहे, पण अजून बरेच काही साध्य करायचे आहे.'' यानंतर पुजाराला संघातून वगळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. एका क्षणी पुजाराला कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह त्याला वगळण्यात आले होते. याबद्दल पुजारा म्हणाला की, “हे आव्हानात्मक होते. मी काऊंटी खेळत होतो आणि मला कुठे काम करायचे आहे याविषयी राहुल भाई आणि विकी पाजी यांच्याशी सतत संपर्कात होतो."
पुजाराची कारकिर्द थोडक्यात
ऑक्टोबर 2010 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण करणार्या चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत करिअरमध्ये एकूण 99 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीच्या 169 डावात फलंदाजी करताना त्याने 44.15 च्या सरासरीने 7021 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने एकूण 19 शतके आणि 34 अर्धशतके केली आहेत. त्याच वेळी, त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 206 धावा आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 51 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-