(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS, 1st Inning : ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढं भारतीय फलंदाजांनी टेकले गुडघे, 117 धावांत संघ सर्वबाद
IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्कनं 5 विकेट्स घेतल्यामुळे भारत 117 धावांत सर्वबाद झाला असून ही आजवरची भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-़डेमधील सर्वात कमी धावसंख्या आहे.
IND vs AUS, 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजी अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे विखुरताना दिसली. विशाखापट्टणमच्या मैदानात सुरु या सामन्यात भारतीय संघ अवघ्या 117 धावांत सर्वबाद झाला आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्कनं 5 विकेट्स घेतल्यामुळे भारत 117 धावांत सर्वबाद झाला असून ही आजवरची भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-़डेमधील सर्वात कमी धावसंख्या आहे. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 31 तर अक्षर पटेलनं नाबाद 29 धावा केल्या आहेत.
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियन संघानं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात भारतानंही टॉस जिंकून पहिली बोलिंग घेत सामना जिंकला होता. ऑस्ट्रेलियाचाही हाच डाव होता. त्यानुसारच त्यांनी भेदक अशी गोलंदाजी देखील केली. त्यांचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कनं अप्रतिम गोलंदाजी करत महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. ज्यामुळे भारतीय संघ केवळ 117 धावाच करु शकला. सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाज आज खराब फॉर्मात होते. शुभमन गिल शून्यावर बाद झाल्यावर विराट-रोहित जोडी कमाल करेल असं वाटत होतं. पण रोहितही 13 धावांवर बाद झाला. मग सूर्या आजही शून्यावर तंबूत परतला. विराट आज एक चांगली धावसंख्या उभारेल असं वाटत होतं. पण त्यालाही कोणाची सोबत मिळत नव्हती. अखेर तो 31 धावा करुन बाद झाला. तसंच केएल 9 , पांड्या 1 जाडेजा 16, कुलदीप यादव 4 तर शमी-सिराज शून्यावर बाद झाले. अक्षरनं अखेरपर्यंत नाबाद 29 धावांची झुंज दिली. पण त्याला कोणाची साथ न मिळाल्याने भारताचा डाव 117 धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने 5 तर सिन अबॉटने 3 आणि नॅतन एलिसने 2 विकेट्स घेतल्या.
Innings Break!#TeamIndia are all out for 117 runs in 26 overs.
— BCCI (@BCCI) March 19, 2023
Scorecard - https://t.co/c1NbIfpAkg #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/XnMVm7s4Xp
मालिकाविजयाची संधी मुकणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पार पडलेल्या कसोटी मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यामुळे टीम इंडियाने (Team India) मालिका 2-1 ने जिंकत बॉर्डर-गावस्कर (BGT 2023) ट्रॉफी खिशात घातली. चौथा सामना अनिर्णित ठरला असला तरी मालिका भारतानेच जिंकली. आता एकदिवसीय मालिकेतही पहिला सामना भारताने जिंकल्यामुळे आज मालिकाविजयाची संधी भारताकडे आहे. पण भारत अवघ्या 117 धावांत सर्वबाद झाल्यामुळे आता भारत हा सामना गमावेल असे वाटत आहे.
हे देखील वाचा-