एक्स्प्लोर

IND vs AFG: भारत उद्या अफगाणिस्तानशी भिडणार, संभाव्य संघ आणि पिच रिपोर्ट घ्या जाणून

IND vs AFG: या सामन्यात भारतीय संघ कोणत्या रणनीतीने मैदानात उतरणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

T20 World Cup 2021: आयसीसी टी-20 विश्वचषकातील 32 व्या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान (India Vs Afghanistan) आमने- सामने येणार आहे. हा सामना उद्या शेख जायद स्डेडिअमवर (Sheikh Zayed Stadium) खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने आपले मागील दोन्ही सामने गमावले. यामुळे उद्याचा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. कारण, या सामन्यात पराभूत झाल्यास भारत विश्वचषकातून बाहेर पडणार आहे. तर, या स्पर्धेत अफगाणिस्तानने नामिबिया आणि स्कॉटलँडला पराभूत केले. मात्र, पाकिस्तानविरुद्ध सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 

Ind vs NZ T20 Series: न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत केएल राहुल भारताचे नेतृत्व करणार? 

अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत अष्टपैलू हार्दिक पांड्याने निराशाजनक कामगिरी केलीय. त्याच्या जागेवर सुर्यकुमार यादवला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. याशिवाय, वरूण चक्रवर्तीच्या जागी रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश केला जाणार, हे जवळपास निश्चित झालंय. भारतीय संघ पुढील सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मागील दोन्ही सामन्यात भारताचे फलंदाज आणि गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरलेत. 

अफगाणिस्तानने आतापर्यंत या स्पर्धेत प्रभावी क्रिकेट खेळले आहे. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलाय. मोहम्मद नबी आणि रशीद खानसारखे खेळाडू भारतीय संघाला आव्हान देण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा उपयोग करतील. युवा फिरकीपटू मुजीब उर रहमान दुखापतीमुळे नामिबियाविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या जागेवर हमीद हसनला खेळवण्यात आले होते. हसनने 4 षटकात केवळ 9 धावा देऊन 3 विकेट्स पटकावले होते. महत्वाचे म्हणजे, मागील दोन्ही सामन्यात भारतीय संघ स्पिनविरुद्ध संघर्ष करताना दिसलाय. ज्यामुळे भारताविरुद्ध सामन्यात मुजीबला पुन्हा संघात सामील केले जाऊ शकते. 

अबुधाबीची खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळू शकते. याठिकाणी मोठी धावसंख्या करणे फलंदाजीसाठी अवघड जात असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होतंय. या मैदानात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. या सामन्यात भारतीय संघ कोणत्या रणनीतीने मैदानात उतरणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

भारत संभाव्य संघ-
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन.

अफगाणिस्तान संभाव्य संघ-
मोहम्मद नबी (कर्णधार), हजरतुल्ला झझाई, अहमद शहजाद, गुलबदीन नायब, नवीन-उल-हक, रशीद खान, हमीद हसन, रहमानउल्ला गुरबाज, नजीबुल्ला जद्रान, करीम जनात, मुजीब उर रहमान.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा; अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं
अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत, शरद पवार-अजितदादांनी एकत्र यावं; राष्ट्रवादीचा स्टार प्रचारक होताच भाऊ कदमनं व्यक्त केली इच्छा
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
Embed widget