(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AFG Preview : टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ ; अफगाणिस्तानचं तगडं आव्हान
भारताच्या विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान, स्कॉटलंड, नामिबियाविरुद्धचे सामने जिंकणं टीम इंडियाच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीनं गरजेचं आहे.
IND vs AFG Preview : यूएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला लागलीय. आज सुपर ट्वेल्व्ह फेरीत भारताचा सामना अफगाणिस्तानशी होतोय. याच फेरीत लागोपाठच्या दोन पराभवांमुळे टीम इंडियाचं सेमीफायनलचं आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. पण पुढचे तिन्ही सामने जिंकून प्रतिष्ठा राखण्याचं आव्हान विराटसेनेसमोर आहे.
विश्वचषकात अफगाणिस्तानचा समावेश सुपर ट्वेल्व्ह फेरीच्या दुसऱ्या गटात आहे. या गटात सध्या हाच संघ दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्ताननं आधी स्कॉटलंडला हरवलं. मग पाकिस्तानविरुद्धचा सामना थोडक्यात गमावला. पण नंतर नामिबियाला हरवून चार गुणांसह अफगाणिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला कमी लेखून चालणार नाही.
अबुधाबीची खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळू शकते. याठिकाणी मोठी धावसंख्या करणे फलंदाजीसाठी अवघड जात असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होतंय. या मैदानात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. या सामन्यात भारतीय संघ कोणत्या रणनीतीने मैदानात उतरणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारताच्या विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्धचे सामने जिंकणं हे टीम इंडियाच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीनं गरजेचं आहे.
Ind vs NZ T20 Series: न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत केएल राहुल भारताचे नेतृत्व करणार?
अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या संघात बदल?
अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत अष्टपैलू हार्दिक पांड्याने निराशाजनक कामगिरी केलीय. त्याच्या जागेवर सुर्यकुमार यादवला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. याशिवाय, वरूण चक्रवर्तीच्या जागी रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश केला जाणार, हे जवळपास निश्चित झालंय. भारतीय संघ पुढील सामन्यात कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मागील दोन्ही सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज आणि गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.
भारत संभाव्य संघ
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन.
अफगाणिस्तान संभाव्य संघ
मोहम्मद नबी (कर्णधार), हजरतुल्ला झझाई, अहमद शहजाद, गुलबदीन नायब, नवीन-उल-हक, रशीद खान, हमीद हसन, रहमानउल्ला गुरबाज, नजीबुल्ला जद्रान, करीम जनात, मुजीब उर रहमान.