India A vs Australia A : भारताच्या अ संघाची दुसऱ्या कसोटीत लाजिरवाणी अवस्था! 6 फलंदाज एकेरी धावांत गटांगळ्या; KL राहुलने पण सोडली संघाची साथ
IND A vs AUS A 2nd Test Update News : लखनऊच्या इकाना स्टेडियमवर भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची अवस्था दयनीय झाली आहे.

India A vs Australia A : लखनऊच्या इकाना स्टेडियमवर भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची अवस्था दयनीय झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 420 धावांचा डोंगर उभारल्यानंतर प्रत्युत्तर भारताचा ‘अ’ संघ फक्त 194 धावांत गडगडला. सहा फलंदाज एकेरी धावसंख्येत गटांगळ्या खात परतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावावरच 226 धावांची भक्कम आघाडी मिळाली.
दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस मात्र ऑस्ट्रेलियाची सुरुवातसुद्धा खराब झाली. त्यांचे तीन गडी 16 धावांवर परतले आहे. सॅम कॉन्स्टास (3), कॅम्पबेल केलावे (0) आणि ऑलिव्हर पीक (1) स्वस्तात बाद झाले. कर्णधार नॅथन मॅकस्वीनी 11 धावांवर नाबाद होता.
फलंदाज एकेरी धावांत गटांगळ्या; KL राहुलने पण सोडली संघाची साथ (IND A vs AUS A 2nd Test KL Rahul flops)
भारतीय डावात सुरुवातीला अनुभवी के.एल. राहुलकडून अपेक्षा होत्या, पण तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. 24 चेंडूत केवळ 11 धावा करून तो आठव्या षटकात माघारी परतला. त्यानंतर एन. जगदीशन (38 धावा, 45 चेंडू) आणि साई सुदर्शन (75 धावा, 140 चेंडू) यांनी थोडी आशा उंचावली. मात्र, त्यांना दुसऱ्या टोकाला साथ देणारा फलंदाजच मिळाला नाही. देवदत्त पडिक्कल, कर्णधार ध्रुव जुरेल आणि नितीश रेड्डी यांच्याकडून फक्त एक-एक धावा आल्या. अखेरचा गडी गुरनूर बरार (1) बाद होताच भारतीय डाव 52.5 षटकांत 194 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून हेन्री थॉर्नटनने चार बळी घेतले. टॉड मर्फीने दोन तर विल सदरलंड, कोरी रोचिचिओली आणि कूपर कोनोली यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
India A collapses against Australia A - 144*/7
— Cricketism (@MidnightMusinng) September 24, 2025
Sai Sudarshan: 42*
N Jagadeesan: 38
Ayush Badoni: 21
KL Rahul: 11
Devdutt Padikkal: 1
Dhruv Jurel: 1
Nitish Kumar Reddy: 1#INDvsAUS #INDvAUS pic.twitter.com/XrPU4KnvMI
याआधी ऑस्ट्रेलियाचा जॅक एडवर्ड्सने सर्वाधिक 88 धावा ठोकल्या. त्याने फिलिपबरोबर सहाव्या विकेटसाठी 52 धावा आणि विल सदरलंडबरोबर आठव्या विकेटसाठी आणखी 52 धावांची भागीदारी करत संघाला 300 च्या पुढे नेले. एडवर्ड्स शतकाच्या उंबरठ्यावर असतानाच गुरनूर बरारच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्याने 78 चेंडूत 11 चौकार व 1 षटकारासह 88 धावा ठोकल्या. भारतीय गोलंदाजांमध्ये डावखुरा फिरकीपटू मानव सुथारने पाच विकेट्स मिळवत चमकदार कामगिरी केली.
हे ही वाचा -





















