IND vs WI, 3rd ODI, Queen Park Oval Stadium : आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथील क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले असले तरी वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश देण्याची 39 वर्षांतील ही पहिलीच संधी भारताला चालून आली आहे. दरम्यान भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West indies) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानाची स्थिती कशी असेल, ते पाहूया...


आजचा सामना होणाऱ्या मैदानातच पहिले दोन्ही सामने खेळवण्यात आले. विशेष म्हणजे दोन्ही सामन्यांमध्ये दोन्ही संघानी 300 पार धावसंख्या नेली. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीज केवळ 3 धावांनी पराभूत झाला. तर दुसऱ्या सामन्यातही भारत अखेरच्या षटकाच 312 धावांचे आव्हान केवळ दोन गडी राखून पूर्ण करु शकला. त्यामुळे दोन्ही चुरशीचे सामने पाहायाला मिळाले आहेत. याशिवाय मैदानाची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी अधिक फायदेशीर असून त्यांना जास्त विकेट मिळून ते धावाही रोखू शकतात. दरम्यान यामुळे भारतीय गोलंदाजीची धुरा युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेलकडे असेल. मैदानाची खेळपट्टी एक मोठी धावसंख्या देखील संघाना मिळवून देऊ शकते. त्यामुळे पहिल्या दोन्ही सामन्यांप्रमाणे एक मोठी धावसंख्या होऊ शकते. 


मालिका भारताच्या खिशात


भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतली असून आजचा सामना जिंकून भारत विंडीजला व्हाईट वॉश देऊ शकतो. मालिकेतील पहिला सामना भारताने 3 धावांनी तर दुसरा सामना 2 विकेट्सनी जिंकला होता. 



संभाव्य भारतीय संघ - शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, संजू सॅमसन (विकेटकिपर), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, आवेश खान.


संभाव्य वेस्ट इंडीज संघ - निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), शेमार ब्रुक, जेसन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोटे, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जयडेन सील्स 



हे देखील वाचा-