India vs West Indies : भारतीय संघ (Indian Team) वेस्ट इंडीजमध्ये (IND vs WI) इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आता संपत आली असून अखेरचा सामना उद्या अर्थात 27 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास भारत विंडीजला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश देईल. 1983 पासून भारत विंडीजविरुद्ध त्यांच्या मायभूमीत मालिका खेळत असून आतापर्यंत भारताने त्यांना त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश दिलेलं नाही. त्यामुळे उद्याचा सामना जिंकल्यास भारत 39 वर्षांत पहिल्यांदा वेस्ट इंडीजमध्ये एकदिवसीय मालिकेतील सारे सामने जिंकेल.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने 3 धावांच्या फरकाने जिंकला. त्यानंतर दुसरा सामनाही अत्यंत चुरशीचा झाला. पण सामन्यात अखेरच्या षटकात अक्षर पटेलच्या कमाल फलंदाजीच्या जोरावर भारताने दोन गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे भारत 3 पैकी 2 सामने जिंकला असून मालिकाही जिंकला आहे. पण मालिकेतील सर्व सामने जिंकून विंडीजला त्यांच्याच भूमीत व्हाईट वॉश देण्याची सुवर्णसंधी भारताकडे आहे. भारताने याआधी झिम्बाब्वे, श्रीलंका या संघाना त्यांच्या भूमीत व्हाईट वॉश दिला आहे.

भारतीय संघ एकदिवसीय मालिकेनंतर वेस्ट इंडीजविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला एकदिवसीय मालिकेनंतर लगेचच सुरुवात होणार असून 27 जुलैला अखेरचा एकदिवसीय सामना झाल्यानंतर 29 जुलैपासून भारत आणि-वेस्ट इंडीज यांच्यातील टी-20 मालिका सुरु होईल.

असं आहे टी20 वेळापत्रक

सामना तारीख ठिकाण
पहिला टी-20 सामना  29 जुलै 2022 पोर्ट ऑफ स्पेन
दुसरा टी-20 सामना 1 ऑगस्ट 2022 सेंट किट्स आणि नेव्हिस
तिसरा टी-20 सामना 2 ऑगस्ट 2022 सेंट किट्स आणि नेव्हिस
चौथा टी-20 सामना 6 ऑगस्ट 2022 फ्लोरिडा, अमेरिका
पाचवा टी-20 सामना 7 ऑगस्ट 2022 फ्लोरिडा, अमेरिका

हे देखील वाचा-