IND vs WI : भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध (India vs West Indies) एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे. आज क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे. सायंकाळी 7 वाजता सुरु होणाऱ्या या सामन्यात जिंकणारा संघ मालिकेत आघाडी घेईल. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असून सामन्यापूर्वली नेमकी मैदानाची स्थिती समजून घेऊ.
कशी आहे मैदानाची स्थिती?
आजचा सामना होणाऱ्या मैदानाची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी अधिक फायदेशीर असून त्यांना जास्त विकेट मिळून ते धावाही रोखू शकतात. दरम्यान यामुळे भारतीय गोलंदाजीची धुरा युजवेंद्र चहलकडे अधिक असेल. मैदानाची खेळपट्टी एक मोठी धावसंख्या देखील संघाना मिळवून देऊ शकते. त्यामुळे किमान 250 धावसंख्या अपेक्षित आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज Head to Head
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीजचा संघ आतापर्यंत 136 वेळा आमने- सामने आले आहेत. यापैकी 67 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. तर, 63 सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं बाजी मारलीय. यातील चार सामने रद्द झाले आहेत. महत्वाच म्हणजे, वेस्ट इंडीजविरुद्ध खेळण्यात आलेल्या अखेरच्या पाच एकदिवसीय सामने भारतानं जिंकले आहेत.
संभाव्य भारतीय संघ - शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, संजू सॅमसन (विकेटकिपर), युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
संभाव्य वेस्ट इंडीज संघ - निकोलस पूरन (कर्णधार), शाई होप (उपकर्णधार), शेमार ब्रुक, जेसन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोटे, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जयडेन सील्स
हे देखील वाचा-
- World Athletics Championships 2022: रोहित यादवचं नीरज चोप्राच्या पावलावर पाऊल, 80.42 मीटर भालाफेक करून अंतिम फेरी गाठली!
- CWG 2022: क्रिकेट, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटनपासून तर प्रत्येक खेळापर्यंत! कॉमनवेल्थ गेम्समधील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक
- Neeraj Chopra: नीरज चोप्रा इतिहास रचणार? पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर थ्रो!