Ricky ponting : आगामी टी20 विश्वचषक (ICC T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात खेळवला जाणार आहे. 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबरपर्यंत पार पडणाऱ्या या स्पर्धेची फायनल भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) हे संघ खेळणार असं भाकित ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने (Ricky Ponting) केलं आहे. आयसीसीशी (ICC) बोलताना पॉटिंगने ही शक्यता वर्तविली आहे.
आयसीसीने दिलेल्या वृत्तात पॉटिंग म्हणाला,'यंदा भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ टी20 वर्ल्ड कप फायनल खेळणार असून ऑस्ट्रेलिया भारताला मात देऊन ट्रॉफी उंचावेल. ऑस्ट्रेलियातच सामने होणार असल्याने ऑस्ट्रेलियाला याचा फायदा होईल. ज्यामुळे सध्या विश्वचषक असणारा ऑस्ट्रेलियाचा संघच ट्रॉफी कायम ठेवेल. युएईमध्ये झालेल्या विश्वचषकात खेळपट्टी ऑस्ट्रेलिया संघासाठी अधिक परिचित नसली तरी, ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता.
इंग्लंडचं आव्हानही मोठं
ऑस्ट्रेलिया आणि भारताशिवाय यंदा टी20 विश्वचषकात इंग्लंडचा संघ एक मोठं आव्हान असणार आहे. सध्या इंग्लंडचा संघ व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये अप्रतिम फॉर्मात आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघही विश्वचषकात चांगली कामगिरी करु शकतो. त्यामुळे भारत, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड हे संघच ट्रॉफी उंचवणार असं पॉटिंगने म्हटलं आहे.
टी20 विश्वचषकासाठी ग्रुप-
ग्रुप 1 | ग्रुप 2 |
अफगाणिस्तान | भारत |
ऑस्ट्रेलिया | पाकिस्तान |
इंग्लंड | दक्षिण आफ्रिका |
न्यूझीलंड | बांग्लादेश |
ग्रुप 'ए' मधील विजेता संघ | ग्रुप 'बी' मधील विजेता संघ |
ग्रुप 'बी' मधील रनरअप संघ | ग्रुप 'ए' रनरअप संघ |
टी-20 विश्वचषकातील सामने कुठे खेळवले जाणार?
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हे देखील वाचा-
- IND vs WI : टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज, एक विजय आणि 39 वर्षांत पहिल्यांदाच करणार 'ही' कामगिरी
- IND vs WI, 2nd ODI Result : अक्षरचं संयमी अर्धशतक, संजू-श्रेयसची भागिदारी, भारतानं सर केला 312 धावांचा डोंगर, मालिकेतही विजयी आघाडी
- WI vs IND T20: वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ त्रिनिदादमध्ये दाखल