India vs West Indies Live : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना (3rd ODI) उद्या (27 जुलै) खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारताने जिंकत मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी घेतली असून आजचा सामना जिंकून भारत विंडीजला व्हाईट वॉश देऊ शकतो. मालिकेतील पहिला सामना भारताने 3 धावांनी तर दुसरा सामना 2 विकेट्सनी जिंकला होता. दरम्यान आता मालिकेतील अखेरचा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...


कधी आहे सामना?


27 जुलै रोजी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना त्रिनिदाद येथील पोर्ट ऑफ स्पेन याठिकाणच्या क्विन्स पार्क ओव्हेल मैदानात खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील हा सामना डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहता येणार आहे. फॅन कोड या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.   


वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ


शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन (विकेटकिपर), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.


हे देखील वाचा-