IND vs SA 5th T20 : अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज; कशी असेल मैदानाची स्थिती, कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड ?
India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी20 मालिका कोण जिंकणार हे आज स्पष्ट होईल. आजचा हा महत्त्वाचा सामना बंगळुरुच्या एम. चिन्नस्वामी मैदानात पार पडणार आहे.
IND vs SA : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात पाचवा आणि मालिकेतील अंतिम टी20 सामना खेळवला जात आहे. बंगळुरुच्या प्रसिद्ध अशा एम.चिन्नस्वामी मैदानावर (M. Chinnaswamy stadium) खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ सध्या मालिकेत 2-2 गुणांसह बरोबरीत असल्याने आजचा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होणार असून 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होणार आहे.
सामना पार पडणाऱ्या बंगळुरुच्या एम. चिन्नस्वामी स्टेडियममध्ये मैदानाची खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावेल. कारण याठिकाणी एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते. त्यात दुसऱ्या इनिंगमध्ये दव पडण्याची शक्यता असल्याने दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं अवघड आहे. ज्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्याची दाट शक्यता आहे.
टीम इंडियाचा रेकॉर्ड खराब!
बंगळुरुच्या एम. चिन्नस्वामी स्टेडियममध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड खास नसल्याचं दिसून आलं आहे. आतापर्यंत इंडियाने इथे 5 टी20 सामने खेळले असून केवळ दोनच जिंकले आहेत. तीन सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. टीम इंडियाने अंतिम टी20 सामना याठिकाणी सप्टेंबर, 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच खेळला होता. त्यावेळी भारत 9 विकेट्सच्या मोठ्या फरकाने पराभूत झाला होता. त्यामुळे आज इंडियाला सावरुन खेळावं लागेल.
आतापर्यंत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका