Ishan Kishan : तबरेज-ईशानमध्ये मैदानात वाद, पुढच्याच बॉलवर चौकार ठोकत ईशानचं सडेतोड उत्तर, पाहा संपूर्ण VIDEO
IND vs SA : भारताचा युवा फलंदाज ईशान किशनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिनही सामन्यात दमदार फलंदाजी करत भारताकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत.
Ishan Kishan and Tabraiz Shamsi Video : तिसऱ्या टी20 सामन्यामध्ये भारताचा दमदार फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) आणि दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेज शम्सी (tabraiz shamsi) यांच्यात मैदानातच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. तबरेजने या वादाची सुरुवात केली पण ईशानने आपल्या बॅटने सडेतोड उत्तर शम्सीला यावेळी दिलं.
दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध तिसरा टी20 सामना भारताने 48 धावांनी जिंकला. यामुळे भारताचं मालिकेतील आव्हान अजूनही जिवंत आहे. दरम्यान याआधीचे दोनही सामने भारताने गमावले. पण या सामन्यातही चांगली कामगिरी करणारा भारतीय खेळाडू म्हणजे ईशान किशन किशनने तीन पैकी दोन सामन्यात अर्धशतक झळकावलं असून एका सामन्यातही 34 धावांची झुंज दिली. दरम्यान तिसऱ्या सामन्यात ईशानचा मैदानावरच दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेज शम्सी याच्यासोबत वाद झाल्याचं पाहायला मिळालं. पण या वादानंतरच ईशानने कडक चौकार ठोकत शम्सीला सडेतोड उत्तर दिलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
पाहा संपूर्ण व्हिडीओ
Ishan kishan reply to shamsi words pic.twitter.com/uFUdQKZ1nn
— Sportsfan Cricket (@sportsfan_cric) June 14, 2022
भारताचा दमदार विजय
दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. मैदान गोलंदाजांसाठी अधिक फायदेशीर असल्याने आधीच दोन सामने गमावलेल्या भारताला चांगली धावसंख्या गाठता येईल असे वाटत नव्हते. पण सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशन यांच्या फलंदाजीने हे चित्रच पलटले. ऋतुराजने 35 चेंडूत 57 तर ईशानने 35 चेंडूत 54 धावा करत संघाची धावसंख्या वाढवली. याशिवाय हार्दिकनेही महत्त्वपूर्ण अशा 31 धावा केल्या. ज्यामुळे भारताने 179 धावा स्कोरबोर्डवर लावत दक्षिण आफ्रिकेसमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले.
180 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवातच खराब झाली. अक्षर पटेल, हर्षल पटेलसह चहलने सुरुवातीपासून उत्तम गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला धावसंख्या वाढवू दिली नाहीच उलट एका मागोमाग एक गडी देखील बाद केले. द. आफ्रिकेकडून हेनरीज क्लासेन याने सर्वाधिक 29 धावा केल्या. तर भारताकडून आयपीएल गाजवणाऱ्या चहल आणि हर्षल पटेलने भेदक गोलंदाजी करत सर्वाधिक विकेट्स घेतले. यावेळी हर्षलने 4 तर चहलने 3 गडी बाद केले. याशिवाय अक्षर पटेल आणि भुवनेश्वर कुमार यांनीही एक-एक विकेट घेतली.
हे देखील वाचा-