ENG vs IND, 3rd ODI, Pitch Report : मँचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्डवर रंगणार निर्णायक सामना, कशी असेल मैदानाची स्थिती, वाचा सविस्तर
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज मँचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्डवर मैदानात तिसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार असून एकदिवसीय मालिकेतील हा अखेरचा सामना असेल.
ENG vs IND : मँचेस्टरच्या ओल्ड ट्रेफर्डवर मैदानात (Old Trafford Stadium) आज भारत आणि इंग्लंड मालिकेती निर्णायक सामना खेळवला जाणार आहे. आजचा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार असल्याने सामना दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे आजच्या सामन्याती मैदानात स्थिती जाणून घेणं गरजेचं आहे. तर आज पार पडणाऱ्या भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानाची स्थिती कशी असेल, ते पाहूया...
कसा आहे पिच रिपोर्ट?
आज सामना होणाऱ्या मँचेस्टर येथील ओल्ड ट्रेफर्ड मैदानावरील खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसाठी अधिक फायदेशीर आहे. याठिकाणच्या खेळपट्टीवर चेंडू बाऊन्स अधिक असल्याने वेगवान गोलंदाज जास्त उत्तम गोलंदाजी करु शकतात. याठिकाणी चेंडूला बाऊन्ससह सीम ही अधिक मिळत असल्याचं दिसून आलं आहे. सप्टेंबर 2020 नंतर पहिल्यांदाच याठिकाणी एकदिवसीय सामना खेळवला जात असून एक रोमहर्षक सामना आज पाहायला मिळू शकतो. खेळपट्टी पाहता प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय़ अधिकजण घेत असल्याने आज नाणेफेकही महत्त्वाची बाब असणार आहे.
कसा आहे भारताचा संघ?
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह
मालिकेत विजय मिळवण्याची संधी
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली जात असलेली एकदिवसीय मालिका सध्या एक-एक बरोबरीत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं 10 विकेट्स राखून जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडनं भारताचा 100 धावांनी पराभव केला. ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाणारा एकदिवसीय सामना निर्णायक असेल. या सामन्यात भारत कशी कामगिरी करतो? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा-
- Singapore Open 2022 : सिंगापूर ओपनच्या फायनलमध्ये सिंधूसमोर चीनचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
- Legends League : लवकरच सुरु होणार लेजेंड्स लीग क्रिकेटचा नवा हंगाम, सेहवागसह पठाण बंधूही उतरणार मैदानात
- IND vs ENG 1st ODI : जबरदस्त! आधी भेदक गोलंदाजी, मग संयमी फलंदाजी, भारताचा इंग्लंडवर 10 विकेट्सनी विजय