एक्स्प्लोर

IND vs BAN : शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर रंगणार दुसरा एकदिवसीय सामना, कशी असेल मैदानाची स्थिती?

IND vs BAN ODI : भारत आणि बांगलादेश यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा दुसरा सामना 7 डिसेंबर रोजी रंगणार असून ढाका येथील शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होईल.

IND vs BAN, Pitch Report : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात सुरु तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वन डे सामना आता खेळवला जाणार असून सध्या मालिकेत बांगलादेश आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशनं भारतावर एका विकेटनं रोमहर्षक असा विजय मिळवत 1-0 ची आघाडी मालिकेत घेतली आहे. आता मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. तर या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे.

सामना होणाऱ्या ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमची खेळपट्टी तशी फलंदाजीसाठी काही प्रमाणात चांगली असली तरी आऊटफिल्ड स्लो असल्याने शॉट्स खेळताना फलंदाजांना मेहनत घ्यावी लागते. एक मोठा स्कोर उभा न होता गोलंदाजांना खास फायदा होतो. विशेष म्हणजे फिरकीपटूंसाठी मदत देणारी ही खेळपट्टी आहे. शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना सरासरी स्कोअर 226 आहे. भारताने या ठिकाणी सर्वाधिक 370-4 इतक्या धावा केल्या आहेत. आजवर चेस करणाऱ्या संघांनी या ठिकाणी 114 पैकी 60 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे आजही नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी घेण्याची शक्यता आजही आहे.

कसा आहे आजवरचा इतिहास?

भारतीय संघ 37 वेळा बांगलादेशसमोर (India vs bangladesh) मैदानात उतरला आहे. आजवर खेळवल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचं पारडं कमालीचं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 37 पैकी 30 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, बांगलादेश संघाला 6 सामने जिंकता आले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.

कसा आहे भारतीय संघ?

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल ,वॉशिंग्टन सुंदर , शार्दुल ठाकूर , मोहम्मद. सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

कधी, कुठे पाहाल सामना?

भारतीय वेळेनुसार भारत विरुद्ध बांगलादेश हा दुसरा एकदिवसीय सामना उद्या अर्थात 7 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.  याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
Virat Kohli Anushka Sharma : दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 90 : टॉप 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 18 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
भाच्याला वाचवण्याच्या नादात मामा, बहिण, मामाची मुलगी वेदगंगा नदीत बुडाले; कोल्हापुरातील भीषण दुर्घटनेनं थरकाप
Virat Kohli Anushka Sharma : दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
दोन लेकरांसाठी अनुष्का अभिनय आणि देशालाही रामराम करणार? विराटच्या 'त्या' व्हिडिओने चर्चा रंगली
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
EPF बॅलेन्स कसं तपासायचं, 'हे' आहेत सर्वांत सोपे चार पर्याय; जाणून घ्या...
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Gurucharan Singh : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,"दुनियादारी सोडून..."
Alka kubal :अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
अल्का कुबल निवडणुका लढवणार का? अभिनेत्रीच्या उत्तराने वेधलं लक्ष, म्हणाल्या, 'राजकारण माझ्या रक्तात...'
Kiran Mane :  लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या पक्षाकडून आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या पक्षाकडून आली होती ऑफर, पण उद्धवजींसोबत... ; किरण मानेंचा मोठा गौप्यस्फोट
Embed widget