Rishabh Pant ICC Test Rankings : जे धोनीला कधीच जमलं नाही ते ऋषभ पंतने करुन दाखवलं, दोन्ही डावात शतक ठोकल्यानंतर ICC कसोटी क्रमवारीत उलटफेर
England vs India 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 24 जून रोजी लीड्स येथे संपला. या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

ICC Test Rankings After Eng vs Ind 1st Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 24 जून रोजी लीड्स येथे संपला. या सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव केला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्याच वेळी, या सामन्यानंतर, नवीनतम आयसीसी कसोटी फलंदाजांची क्रमवारी जाहीर झाली आहे. ज्यामध्ये टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा जलवा दिसून आला. पंतने पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली, त्यानंतर त्याला कसोटी क्रमवारीत जोरदार फायदा मिळाला.
Two centurions from the first #ENGvIND Test have reached career-best ratings in the latest ICC Men's Player Rankings 👏
— ICC (@ICC) June 25, 2025
Read more ⬇️https://t.co/iRzq5boyLf
ऋषभ पंतने क्रमवारीत इतिहास रचला
लीड्स कसोटीनंतर ऋषभ पंत नवीनतम आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत सातव्या स्थानावर पोहोचला आहे. आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पंत कसोटी क्रमवारीत 800 गुण मिळवणारा पहिला यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ऋषभ पंतचे 801 रेटिंग गुण आहेत. पंतने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवले आहे. म्हणजे जे धोनीला कधीच जमलं नाही ते ऋषभ पंतने करुन दाखवलं.
🚨 HISTORY BY RISHABH PANT 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) June 25, 2025
- Pant becomes the first Indian Wicket-keeper batter to have 800 Rating points in Test History 🇮🇳 pic.twitter.com/uWKCqXPqCk
पंतने दोन्ही डावात ठोकले शतकं
लीड्स कसोटीच्या दोन्ही डावात पंतने शतके झळकावली. त्याने पहिल्या डावात 134 आणि दुसऱ्या डावात 118 धावा केल्या. यासह, ऋषभ पंत कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा जगातील दुसरा यष्टिरक्षक फलंदाज बनला आहे. यापूर्वी, झिम्बाब्वेचा दिग्गज फलंदाज अँडी फ्लॉवरने ही कामगिरी केली होती.
The calm and the storm. Together = 💥#SonySportsNetwork #GroundTumharaJeetHamari #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia pic.twitter.com/FNCoJFS5Mo
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) June 23, 2025
बेन डकेटलाही झाला फायदा
पहिल्या कसोटीत इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बनलेल्या डकेटनेही शानदार कामगिरी केली. डकेटने पहिल्या डावात 62 आणि दुसऱ्या डावात 149 धावा केल्या. त्यानंतर बेन डकेटलाही रँकिंगमध्ये खूप फायदा झाला आहे. डकेट आता 5 स्थानांनी झेप घेऊन आठव्या स्थानावर पोहोचला आहे.
हे ही वाचा -





















