ICC T20 Rankings : आयसीसी टी-20 रँकिंगमध्ये सूर्यादादाची हवा, अव्वल स्थानी कायम
ICC T20I Ranking : भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव आयसीसी T20I क्रमवारीत जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून कायम असून त्याच्य नावावर 890 गुण आहेत.
Suryakumar Yadav No.1 T20I Batter : भारतीय क्रिकेट संघात सध्या सर्वात दमदार फॉर्मात असलेला फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टी-20 क्रिकेटमधील नंबर-1 फलंदाज म्हणून अजूनही कायम आहे. आयसीसीने (ICC Ranking) जाहीर केलेल्या ताज्या T20 क्रमवारीत तो अव्वल स्थानावर विराजमान आहे. सूर्याच्या नावावर 890 गुण आहेत. त्याच्याशिवाय पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर 836 गुण आहेत. सूर्यकुमार यादवने अलीकडच्या काळात टी-20 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकात त्याने बऱ्याच धावा केल्या असून न्यूझीलंडविरुद्धही त्याने नुकताच टी20 शतक ठोकलं.
T20 विश्वचषकात सूर्याने 239 धावा केल्या होत्या अजूनही त्याची कमाल कामगिरी चांगली असून नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत दोन सामनेच झाले, ज्यामध्ये त्याने 124 धावा केल्या. यामध्ये एका शतकाचाही समावेश होता. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 मध्ये त्याने 111 धावांची तुफानी खेळी केली. त्यानंतर त्याचे रेटिंग पॉइंट 895 वर गेले होते. मात्र यानंतर तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात 13 धावा करून तो बाद झाला. त्यामुळे 5 गुणांचं नुकसान त्याला झालं असून आता 890 गुणांसह तो पहिल्या स्थानवर आहे.
🔹 Suryakumar Yadav continues to shine
— ICC (@ICC) November 23, 2022
🔹 A host of Australia stars make big gains
The latest movements on the @MRFWorldwide ICC Men's Player Rankings ⬇️ https://t.co/3WOEsj9HrQ
टॉप 10 कशी?
आयसीसी टी20 बॅटिंग रँकिंगचा विचार करता सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर यादीत पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान 869 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वेचे 788 रेटिंग गुण आहेत आणि तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 778 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्करम 748 गुण आहेत आणि तो पाचव्या स्थानावर आहे.
याशिवाय इंग्लंडचा डेव्हिड मलान 719 गुणांसह सहाव्या, न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स 699 गुणांसह सातव्या, दक्षिण आफ्रिकेचा रिले रोसो 693 गुणांसह आठव्या, ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच 680 गुणांसह नवव्या आणि श्रीलंकेचा पाथुम निसांका 673 गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.
हे देखील वाचा-