ICC T-20 World Cup 2024: ना रोहित, ना विराट, विश्वचषकात शतक झळकवणारा एकमेव भारतीय फलंदाज; 14 वर्षांपूर्वी केला होता भीमपराक्रम
ICC T-20 World Cup 2024: 2007 साली प्रथम टी-20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
ICC T-20 World Cup 2024: आगामी 2 जून पासून आयसीसी टी-20 विश्वचषकाची (ICC T-20 World Cup 2024) स्पर्धा रंगणार आहे. 2007 साली प्रथम टी-20 विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव करत इतिहासातील पहिला T20 क्रिकेट विश्वविजेता बनण्याचा पराक्रम केला. आजपर्यंत टी-20 विश्वचषक स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सामने खेळले गेले आहेत, परंतु आजपर्यंत केवळ 11 वेळा खेळाडूने 100 धावांचा टप्पा पार केला आहे. यामध्ये आजपर्यंत सुरेश रैना (Suresh Raina) हा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने टी-20 विश्वचषकात शतक झळकावले आहे.
सुरेश रैना हा एकमेव भारतीय शतकवीर-
टी-20 विश्वचषकात शतक झळकावणारा सुरेश रैना हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. 2010 च्या विश्वचषकात त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही खेळी खेळली होती. क गटातील या सामन्यात भारताने प्रथम खेळताना स्कोअरबोर्डवर 5 गडी गमावून 186 धावा केल्या. या सामन्यात रैनाने 59 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि त्याचा डाव 60 चेंडूत 101 धावांवर संपला. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 5 षटकार मारले. त्यानंतर पाच विश्वचषक स्पर्धा झाल्या, मात्र रैनाशिवाय एकाही भारतीय खेळाडूला शतक झळकावता आलेले नाही.
शतक झळकावणारा रैना तिसरा खेळाडू ठरला
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात सुरेश रैना टी-20 क्रिकेटच्या इतिहासात शतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी ख्रिस गेलने 2007 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 75 चेंडूत 117 धावांची खेळी केली होती. सुरेश रैनाची ही ऐतिहासिक खेळी 2 मे 2010 रोजी आली. दुसऱ्याच दिवशी श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात 80 चेंडूत 100 धावा केल्या.
T-20 विश्वचषकातील भारतीय खेळाडूची सर्वात मोठी खेळी
टी-20 विश्वचषकात आजपर्यंत शतक झळकावणारा सुरेश रैना एकमेव भारतीय असल्याने, भारतीय खेळाडूने खेळलेल्या सर्वात लांब खेळीचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. त्याच्यानंतर भारतीय खेळाडूने बनवलेली सर्वोच्च धावसंख्या विराट कोहलीच्या नावावर आहे. कोहलीने 2016 च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात 63 चेंडूत 89 धावांची नाबाद खेळी खेळली होती.
टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज
राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान.
भारतीय संघाचे वेळापत्रक
5 जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क
9 जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क
12 जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क
15 जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा
संबंधित बातम्या:
टी-20 विश्वचषक, पत्नी नताशासोबत घटस्फोटाची चर्चा; आता हार्दिक पांड्याने केली पोस्ट, काय म्हणाला?