ICC Rankings : झिम्बाब्वेचा रजा झाला वनडेचा 'सिकंदर'! आयसीसी रँकिंगमध्ये घेतली मोठी झेप, जाणून घ्या A टू Z
आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय ऑलराउंडर क्रमवारीत मोठी उलथापालथ दिसून आली आहे.

ICC Rankings Updates Sikandar Raza : आयसीसीने ताज्या एकदिवसीय क्रमवारी जाहीर केल्या आहेत. आयसीसी पुरुषांच्या एकदिवसीय ऑलराउंडर क्रमवारीत मोठी उलथापालथ दिसून आली आहे. अफगाणिस्तानचा धडाकेबाज अष्टपैलू अझमतुल्ला उमरजईची बादशाही संपली आहे. तो एका पायरीने घसरून दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याचप्रमाणे मोहम्मद नबीलाही फटका बसला असून तो दुसऱ्या वरून तिसऱ्या स्थानी गेला आहे.
🚨 39 YEAR OLD SIKANDAR RAZA - NEW NO.1 RANKED ODI ALL ROUNDER. 🚨 pic.twitter.com/EA9iwnaVPt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 3, 2025
सिकंदर रजा बनला नंबर-1 ODI ऑलराउंडर
झिम्बाब्वेचा स्फोटक खेळाडू सिकंदर रजा अव्वल क्रमांकावर झेपावला आहे. रजाने दोन स्थानांची झेप घेतली असून हरारे येथे श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांतील शानदार कामगिरीचा त्याला फायदा झाला. या मालिकेत त्याने दोन अर्धशतके ठोकली आणि महत्त्वाची विकेट घेतली. त्याच्या या कामगिरीमुळे 302 गुण वर गेला आणि त्याने अफगाण जोडी अजमतुल्लाह उमरजई (296) आणि मोहम्मद नबी (292) यांना मागे टाकले आहे. शिवाय, रजा फलंदाजी रँकिंगमध्येही नऊ स्थानांची झेप घेत 22व्या स्थानी पोहोचला आहे.
New No.1 👀
— ICC (@ICC) September 3, 2025
More as a Zimbabwe all-rounder stands at the top of the latest ICC ODI rankings ⬇️https://t.co/73Dg25vySJ
टॉप-10 मध्ये तीन न्यूझीलंड ऑलराउंडर
बांगलादेशचा मेहदी हसन मिराज आणि न्यूझीलंडचा मायकेल ब्रेसवेल अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी कायम आहेत. न्यूझीलंडचा मिचेल सॅटनर एका पायरी वर येत सहाव्या, तर अफगाणिस्तानचा राशिद खान सातव्या स्थानी पोहोचला आहे. स्कॉटलंडचा ब्रँडन मॅकमुलेन दोन स्थानांनी खाली गेला असून भारताचा रवींद्र जडेजा नवव्या स्थानी कायम आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा रचिन रवींद्र दोन स्थानांनी प्रगती करत टॉप-10 मध्ये दहाव्या स्थानी दाखल झाला आहे.
गोलंदाजी रँकिंगमध्येही बदल
वनडे गोलंदाजी रँकिंगमध्येही फेरबदल झाले आहेत. श्रीलंकेचा महेश तीक्षाना पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानी घसरला आहे. याआधी तो दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराजसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानी होता. भारताचा रवींद्र जडेजा न खेळता एक स्थान वर चढत आठव्या स्थानी आला आहे. तर श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा एका पायरीने घसरून नवव्या स्थानी गेला आहे.
हे ही वाचा -





















