World Cup 2023: हार्दिक पांड्यामुळे टीम इंडियाचा बॅलेन्स बिघडला, शार्दूल ठाकूर संघाबाहेर जाणार?
ICC World Cup 2023: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यामुळे (Hardik Pandya) टीम इंडियाचा (Team India) बॅलेन्स बिघडला आहे. हार्दिक पांड्यामुळे टीम इंडियाला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये संतुलन मिळत होते. पण आता हार्दिक पांड्या नसल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत भर पडली आहे.
ICC World Cup 2023: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यामुळे (Hardik Pandya) टीम इंडियाचा (Team India) बॅलेन्स बिघडला आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरोधातील (India vs New Zealand) सामन्यासाठी उपलब्ध नाही. हार्दिक पांड्यामुळे टीम इंडियाला गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये संतुलन मिळत होते. पण आता हार्दिक पांड्या नसल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत भर पडली आहे. रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात बदल निश्चित होणार आहे. रविवारी भारतीय संघात दोन बदल होण्याची शक्यता आहे.
धर्मशाला (DharmaShala) येथे होणारा भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. पण या सामन्यात हार्दिक पांड्या उपलब्ध नाही. हार्दिक नसल्यामुळे टीम इंडियासाठी मोठा फटका बसणार आहे. कारण, हार्दिक पांड्या दहा षटके गोलंदाजी करण्यासाठी फलंदाजीतही चांगले योगदान देतोय. तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन हार्दिक पांड्या फटकेबाजी करण्यात माहीर आहे. अशात आता हार्दिक नसल्यामुळे संघाचा बॅलेन्स बिघडला आहे. हार्दिक नसल्यामुळे शार्दूल ठाकूरलाही (Shardul Thakur) संघाबाहेर बसावे लागू शकते. कारण, शार्दूल ठाकूर महागडी गोलंदाजी करतो. त्याशिवाय त्याला विकेट घेण्यातही अपयश येतेय.
न्यूझीलंडविरोधात दोन बदल होण्याची शक्यता
धर्मशाला येथे होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल होणार आहेत. हार्दिक पांड्याच्या जागी एका खेळाडूला संधी मिळणार, हे निश्चित आहे. पण त्याशिवाय शार्दूल ठाकूर यालाही बेंचवर बसावे लागण्याची चिन्हं आहेत. शार्दूल ठाकूरच्या जागी मोहम्मद शामीला (Mohammed Shami) प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची संधी आहे. तर हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह हे तीन वेगवान गोलंदाज भारतीय संघाची धुरा संभाळतील. तर रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव हे फिरकीचा मारा संभाळतील. भारतीय संघ तीन वेगावान आणि दोन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरु शकतो.
फलंदाजी-गोलंदाजी कशी?
हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमुळे भारताकडे सहाव्या गोलंदाजीचा पर्याय नसेल. मात्र, रोहित शर्मा नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसला, तर विराटनेही बांगलादेशविरुद्ध 3 चेंडू टाकले होते. त्याशिवाय श्रेयस अय्यरही काही वेळा फिरकी गोलंदाजी करताना दिसला आहे, त्यामुळे गरज भासल्यास कर्णधार सहावा गोलंदाज म्हणून हे पर्याय वापरू शकतो. तर फलंदाजीत सूर्यकुमार यादव सहाव्या आणि रवींद्र जडेजा सातव्या क्रमांकावर येऊ शकतात.