ICC Mens T20 Ranking : यंदा टी20 विश्वचषक मोठ्या उत्साहात आणि अगदी चुरशीमध्ये पार पडला. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना जिंकत चषकावर नाव कोरलं. त्याआधी आयपीएल तसंच बिग बॅश लीग अशा अनेक टी20 क्रिकेट स्पर्धांनी यंदाचं वर्ष टी20 क्रिकेटसाठी खास ठरलं. दरम्यान आता नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात आयसीसीने (ICC) टी20 फलंदाजांची रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने पहिलं स्थान पटकावलं आहे. विशेष म्हणजे टॉप 10 फलंदाजामध्ये केवळ एकच भारतीय आहे.


यंदाच्या वर्षात टी20 क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानचे सलामीवीर कर्णधार बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान यांनी अनेक विक्रम केले. दोघांनी भारताविरुद्ध 10 विकेट्सनी विजय मिळवण्यासह अनेक दमदार रेकॉर्ड नावे केले. त्यामुळेच या दोघांनी आयसीसी टी20 फलंदाजी रँकिगमध्येही प्रगती केली आहे. बाबरने दोन स्थानांची झेप घेत पहिलं स्थान तर रिझवानने एका स्थानाची झेप घेत तिसरं स्थान मिळवलं आहे. याशिवाय इंग्लंडचा डेविड मलान हा दुसऱ्या स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा मार्करम चौथ्या आणि टॉप 10 फलंदाजामध्ये असणारा एकमेव भारतीय केएल राहुल हा चौथ्या स्थानावर आहे. तर नेमकी यादी कशी आहे यावर एक नजर फिरवूया...



  1. बाबर आजम (805 गुण) 

  2. डेविड मलान (805 गुण)

  3. मोहम्मद रिझवान (798 गुण)

  4. ए. मार्करम (796 गुण)

  5. केएल राहुल (729 गुण)

  6. आरॉन फिंच (709 गुण)

  7. डेवॉन कॉन्वे (703 गुण)

  8. जोस बटलर (674 गुण)

  9. आर. डस्सेन (669 गुण)

  10. मार्टीन गप्टील (658 गुण)



हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha