The Ashes : अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात दमदार विजय मिळवल्यानंतर ही विजयी मालिका ऑस्ट्रेलियाने (Australia) दुसऱ्या सामन्यातही (Ashes Second Test) कायम ठेवली आहे. पहिल्या सामन्यातील 9 विकेट्सच्या विजयानंतर आता दुसऱ्या सामन्यातही तब्बल 275 धावांनी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. सामन्यात इंग्लंडच्या (England) फलंदाजाना सुरुवातीपासूनच खास कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे गोलंदाजही चांगली लय न पकडू शकल्याने सुरुवातीपासून सामना ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात होता, जो अखेर जिंकत ऑस्ट्रेलिया मालिकेतही पुढे पोहोचली आहे.   



असा झाला सामना


सामन्यात नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला. जो निर्णय ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अगदी बरोबर ठरवत सुरुवातीपासून धमाकेदार फलंदाजी सुरु ठेवली. लाबुशेनचं (103) शतक आणि वॉर्नर (95) आणि स्मिथ (93) यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 473 धावा केल्या. ज्यानंतर इंग्लंडचा डाव 236 धावांवर आटोपला. नंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 230 धावांवर घोषित करत इंग्लंडसमोर विजयासाठी 468 धावांच लक्ष ठेवलं. पण ऑस्ट्रेलियाचा युवा गोलंदाज जे रिचर्डसनने (jhye richardson) सलामीच्या सामन्यात एका डावात 5 विकेट्स घेत इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांवर आटोपला. ज्यामुळे सामना 275 धावांनी ऑस्ट्रेलियाने खिशात घातला.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha