The Ashes : अॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात (Ashes Second Test) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर तब्बल 275 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. दरम्यान सामन्यात इंग्लंडच्या (England) जोस बटलरने अतिशय चिवट झुंज देत सामना किमान अनिर्णीत ठेवण्याचा प्रयत्न केला. पण अखेर तो हीट विकेट झाल्याने सामना अनिर्णीत करु शकला नाही.

  


सामन्यात इंग्लंडला अखेरच्या डावात विजयासाठी 468 धावांचं लक्ष होत. पण ख्रिस वोक्स (44) शिवाय कोणीच खास कामगिरी करु शकलं नाही. दरम्य़ान कायम विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा जोस बटलर मात्र यावेळी वेगळ्या अंदाजात दिसला. बटलरने 258 मिनिटं मैदानात थांबत तब्बल 207 चेंडू खेळले. यामध्ये त्याने केवळ 26 धावाच केल्या. पण सामना बराच वेळ सुरु ठेवण्यात बटलरने प्रयत्न केला. पण अखेर रिचर्डसनच्या चेंडूवर तो हीटविकेट झाल्याने त्याचा डाव संपला आणि इंग्लंडला पराभव स्वीकारावा लागला.



असा झाला सामना


सामन्यात नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाने घेतला. जो निर्णय ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अगदी बरोबर ठरवत सुरुवातीपासून धमाकेदार फलंदाजी सुरु ठेवली. लाबुशेनचं (103) शतक आणि वॉर्नर (95) आणि स्मिथ (93) यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 473 धावा केल्या. ज्यानंतर इंग्लंडचा डाव 236 धावांवर आटोपला. नंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 230 धावांवर घोषित करत इंग्लंडसमोर विजयासाठी 468 धावांच लक्ष ठेवलं. पण ऑस्ट्रेलियाचा युवा गोलंदाज जे रिचर्डसनने (jhye richardson) सलामीच्या सामन्यात एका डावात 5 विकेट्स घेत इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांवर आटोपला. ज्यामुळे सामना 275 धावांनी ऑस्ट्रेलियाने खिशात घातला.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha