India Tour of South Africa : भारतीय क्रिकेट संघ (IND) सध्या दक्षिण आफ्रिका (SA) दौऱ्यावर आहे. 26 डिसेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. यातील पहिला सामना सेंचुरियनमध्ये खेळला जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघ तेथे पोहोचला असून त्यांचा सराव देखील सुरू आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने कोरोनाच्या नव्या ओमाक्रॉनच्या (Omicron) पार्श्वभूीवर सुरक्षेची पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी आफ्रिका क्रिकेट बोर्ड सतत भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) संपर्कात आहे. परंतु, या सामन्याआधी चाहत्यांसाठी एक धक्का देणारी बातमी आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे या मालिकेतील पहिला सामना प्रेषकांशिवाय होणार आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ओमायक्रॉनचा वाढता प्रसार लक्षात घेऊन कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याची तिकीटे विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. आफ्रिका बोर्डाने मागील काही दिवसांपूर्वी कोरोना नियमांचे पालन करून दोन हजार लोकांना मैदानात जाण्याची परवानगी दिली होती. परंतु, आता खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेऊन तिकीट विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, इतर सामन्यांसाठी हा निर्णय लागू असले की नाही, याबाबत आफ्रिकी बोर्डाने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. परिस्थितीची माहिती घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आफ्रिकी बोर्डाने सांगितले आहे.
कधी होणार सामने?
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. 26 डिसेंबर रोजी पहिला सामना रंगणार आहे. दुसरा सामना 3 जानेवारीपासून सुरू होईल. तर शेवटचा आणि तिसरा सामना 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
असा असेल भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाल, केएल राहुल (उप-कर्णधार), मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.
महत्वाच्या बातम्या
South Africa Tour : भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल, लवकरच सामन्यांना सुरुवात
India U19 WC Sqaud 2022 : आगामी अंडर 19 विश्वचषकासाठी भारतीय संघ सज्ज, BCCI ने जाहीर केला संघ