Team India : भारतीय संघ (IND) टेस्ट सीरीजसाठी दक्षिण आफ्रीका (SA) येथे पोहोचला आहे. 26 डिसेंबरपासून कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु होणार आहे. दोन्ही संघासाठी ही मालिका अतिशय महत्त्वाची असून भारताने ही मालिका जिंकल्यास 29 वर्षांत पहिल्यांदाच भारत आफ्रिकेत मालिका जिंकले. त्यासोबतच भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्याकडे या मालिकेत एक खास रेकॉर्ड करण्याची संधी आहे.


राहुल द्रविडचा 'हा' रेकॉर्ड तोडू शकतो कोहली


राहुल द्रविडमने दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्यामध्ये दुसरा क्रमांक गाठला आहे. त्याने 11 सामन्यात 22 डावांत 624 धावा केल्या आहे. तर कोहली यामध्ये चौथ्या क्रमांकावर असून त्याने पाच कसोटी सामन्यात 55.80 च्या सरासरीने 558 धावा केल्या आहेत. त्यामुळे या टेस्ट सीरीजमध्ये 66 धावा करताच कोहली द्रविडला मागे टाकेल. तर 9 धावा करताच व्हीव्हीएस लक्ष्मण जो 566 धावांवर आहे त्याला विराट मागे टाकेल. दरम्यान या यादीत सर्वात एक नंबरवर सचिन तेंडुलकर असून त्याच्या नावावर 1 हजार 161 धावा आहे.



असा असेल दौरा 



भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये 3 कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. तर नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नेमका दौरा कसा असेल यावर एक नजर फिरवूया...


कसोटी सामन्यांचे वेळापत्रक 



  • पहिला कसोटी सामना -  26 डिसेंबर, 2021 ते 30 डिसेंबर, 2021 सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन.

  • दुसरा कसोटी सामना -  3 जानेवारी,2022 ते 7 जानेवीर, 2022 न्यू वांडरर्स मैदान, जोहान्सबर्ग.

  • तिसरा कसोटी सामना -  11 जानेवारी, 2022 ते 15 जानेवारी, 2022 न्यू लँड्स, केपटाऊन  


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha