Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीची पीसीबीकडून तयारी पण आयसीसी वेगळ्या निर्णयाच्या तयारीत? पाकिस्तानला धक्का बसणार
ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाचा मान पाकिस्तानकडे आहे. मात्र, आयसीसीच्या वार्षिक बैठकीत पीसीबीला मोठा धक्का बसू शकतो.
ICC Champions Trophy 2025 नवी दिल्ली: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तान करणार आहे. पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी ते मार्च 2025 च्या दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आयोजनासाठी मैदानांची डागडुजी करण्यासाठी सुरुवात केलीय. मात्र, श्रीलंकेत होत असलेली आयसीसीची वार्षिक बैठक महत्त्वाची ठरणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी पुढील 72 तास महत्त्वाचे ठरणार आहे. एका हिंदी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून चॅम्पियन्स ट्राफीचं आयोजक पद काढून घेतलं जाऊ शकतं. 19 ते 22 जुलै दरम्यानं याबाबत मोठा निर्णय होऊ शकतो.
चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन पाकिस्तान करणार आहे. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च 2025 दरम्यान सामन्यांचं आयोजन करण्याचा प्रस्ताव पीसीबीनं दिला आहे. भारत कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला जाण्यासाठी तयार नाही.चॅम्पियन्स ट्रॉफीतून भारतानं माघार घेतल्यास संपूर्ण स्पर्धेतून आयसीसीला अपेक्षित असलेलं उत्पन्न मिळू शकणार नाही. त्यामुळं आयसीसी कोणतीही जोखीम न पत्कारता संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान ऐवजी दुसऱ्या देशात आयोजित करु शकते. यामध्ये श्रीलंका किंवा दुबईचा पर्याय आहे.
दैनिक भास्करच्या रिपोर्टमध्ये सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे दावा करण्यात आली की आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीलंका किंवा दुबईमध्ये खेळवू शकते. सुरुवातीला ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवण्याच्या चर्चा होत्या. हायब्रीड मॉडेलनुसार भारत पाकिस्ताना जाण्याऐवजी दुसऱ्या देशात सामने खेळू शकतो. भारताच्या मॅचेस दुबई किंवा श्रीलंकेत होतील अशा चर्चा होत्या. आता मात्र, संपूर्ण चॅम्पियन्स ट्रॉफी दुबई किंवा श्रीलंकेत खेळवण्याबाबत चर्चा सुरु आहेत.
भारताला कुणाचा पाठिंबा?
भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही या भूमिकेवर ठाम आहे. भारताच्या या भूमिकेचं समर्थन इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानं देखील केलं आहे. आयसीसीच्या कोलंबोतील वार्षिक बैठकीत भारत चॅम्पियन्स ट्राफीचं ठिकाण बदलण्याची मागणी करु शकतो. त्याला इतर देशांचा पाठिंबा देखील मिळू शकतो.
आशिया कपमध्ये भारताचे सामने श्रीलंकेत
2023 मध्ये आशिया कपचं आयोजन पाकिस्तानकडे होतं. भारतानं त्यावेळी देखील आशिया कप खेळण्यास पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. भारताचे सामने त्यावेळी श्रीलंकेत आयोजित करण्यात आले होते. भारत पाकिस्तान मॅच देखील श्रीलंकेत झाली होती.
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताच्या गटात पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेशचा समावेश आहे.भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमधील गुणतालिकेत 1 ते 8 च्या दरम्यान असलेल्या संघांना चॅम्पियन्स ट्रॉफीत प्रवेश मिळाला आहे.
संबंधित बातम्या :