World Cup 2023: वर्ल्ड कपमध्ये विराट 7 किलोमीटर धावला, 401 धावा पळून काढल्या, इथेही किंग नंबर 1
Virat Kohli Run in World Cup 2023 : शानदार प्रदर्शन करत रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया अव्वल स्थानावर विराजमान आहे.
Virat Kohli Run in World Cup 2023 : शानदार प्रदर्शन करत रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडिया अव्वल स्थानावर विराजमान आहे. भारतीय संघाने लागोपाठ दहा सामन्यात विजय मिळवत फायनल गाठली. यामध्ये रनमशीन विराट कोहलीचाही मोठा वाटा आहे. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट कोहली अव्वल स्थानावर आहे.
रनमशीन विराट कोहलीने विश्वचषकात शानदार कामगिरी केली आहे. विराटच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतोय. विराट कोहलीने 10 सामन्यात 711 धावांचा पाऊस पाडलाय. विश्वचषकात सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजात विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. पण त्याच्या नावावर आणखी एक अनोखा विक्रम नोंदवला गेलाय. विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषकात तब्बल 56 टक्के धावा पळून काढल्या आहेत. म्हणजेच काय तर... विराट कोहली याने यंदाच्या विश्वचषकात एकेरी आणि दुहेरी धावसंख्येवर जास्त भर दिलाय. त्याचा फायदा टीम इंडियाला झालेला दिसतेय. विराट कोहलीने एक बाजू लावून धरल्यामुळेच इतर फलंदाजांना विस्फोटक फलंदाजी करत आली. यंदाच्या विश्वचषकात धावून सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजात विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे.
कोहली पहिल्या क्रमांकावरच -
विराट कोहली शानदार प्लेसमेंट आणि टायमिंगसह मैदानाच्या चारी बाजून फटकेबाजी करतो. तो चौकार-षटकार मारण्याऐवजी धावसंख्या हलती ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक चेंडूवर धाव निघावी, असाच त्याचा प्रयत्न असतो. विराट कोहलीने 56 टक्के धावा या दोन विकेटच्या मध्ये धावून काढल्या आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत 7 किमीपर्यंत धावालाय. चौकार षटकार मारण्याऐवजी विराट कोहली संयमाने धावा वाढवतो. विराट कोहलीने एकेरी दुहेरी धावा काढत यंदाच्या विश्वचषकात 401 धावा केल्या आहेत. तो एकू सात किमीपर्यंत धावला आहे. ज्या खेळपट्टीवर सामना होती त्याची लांबी 17.68 मीटर म्हणजेच 22 फूट इतकी असते.
विराट कोहलीनंतर कोण कोण ?
न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज रचिन रवींद्र दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीत पराभूत होऊन न्यूझीलंड बाहेर पडला, पण युवा फलंदाज रचिन रवींद्रने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. किवी फलंदाजाने विश्वचषकातील 10 सामन्यांमध्ये 578 धावा केल्या, त्यापैकी 4.52 किलोमीटर धावत त्याने 256 धावा केल्या.
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, विराट कोहली आणि रचिन रवींद्र यांच्यानंतर, आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डर डुसेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. डुसेनने विश्वचषकातील 10 सामन्यांमध्ये एकूण 448 धावा केल्या, त्यापैकी 244 धावा 4.31 किलोमीटर धावून केल्यात. विकेटकिपर फलंदाज क्विंटन डी कॉक चौथ्या क्रमांकावर आहे. डी कॉकने 10 विश्वचषक सामन्यांमध्ये 594 धावा केल्या आहेत, त्यापैकी 240 धावा 4.24 किलोमीटर धावून केल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरनेही चौकार न लावता २३८ धावा केल्या आहेत, जर अंतर मोजले तर हे अंतर एकूण ४.२० किलोमीटर आहे. धावून धावा करण्याच्या बाबतीत अय्यर पाचव्या स्थानावर आहे.