ICC Champions Trophy 2025: 'ICC चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानमध्ये न आल्यास...'; माजी क्रिकेटपटूने दिला इशारा
ICC Champions Trophy 2025: पाकिस्तानने जवळपास 28 वर्षांपासून कोणत्याही आयसीसी स्पर्धेचे आयोजन केलेले नाही.
Rashid Latif On ICC Champions Trophy 2025: ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (ICC Champions Trophy) पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. खरंतर, पाकिस्तानने जवळपास 28 वर्षांपासून कोणत्याही आयसीसी स्पर्धेचे आयोजन केलेले नाही. 1996 मध्ये पाकिस्तानात अखेरचा विश्वचषक आयोजित करण्यात आला होता.
1996 च्या विश्वचषकाचे यजमानपद पाकिस्तानशिवाय भारत आणि श्रीलंका हे होते. यानंतर भारत आणि श्रीलंकेने आयसीसीच्या अनेक स्पर्धांचे आयोजन केले, पण पाकिस्तानला संधी मिळाली नाही. आता पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची तयारी करत आहे, मात्र भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे सांगत आहे.
'आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकणे भारतासाठी सोपे नाही'
आता पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज राशिद लतीफ याच्या वक्तव्याने भारताच्या पाकिस्तानात न जाण्याच्या वृत्तीवर पडदा पडला आहे. रशीद लतीफ यांना वाटते की, भारताच्या या कृतीचा उलटा परिणाम होऊ शकतो. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर बहिष्कार टाकणे भारतासाठी सोपे नसेल. तुम्ही द्विपक्षीय मालिका नाकारू शकता, पण आयसीसी स्पर्धा नाकरणे कठीण आहे. जेव्हा आयसीसीने संपूर्ण योजना तयार केली आहे, तेव्हा तुम्हाला कुठे खेळायचे हे माहित आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ ज्या प्रकारे विश्वचषक खेळण्यासाठी पाकिस्तानात गेला होता.
तुम्हाला भोगावे लागू शकतात...
पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक फलंदाज रशीद लतीफ म्हणाला की, संघ संमतीनंतर आयसीसी स्पर्धेसाठी स्वाक्षरी करतात, मग तुम्ही नकार कसा देऊ शकता? पाकिस्तानमध्ये परिस्थिती चांगली नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही... त्यामुळे भारतीय संघाने पाकिस्तानचा दौरा नाकारला, तर त्याचा फटका बसू शकतो, त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात, असा इशारा लतीफने दिला.
भारताला समजावण्यासाठी पाकिस्तानची धडपड-
पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी बोर्डाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "भारत टीम इंडियाला पाकिस्तान दौऱ्यावर पाठवणार की, आशिया चषक 2023 सारखीच परिस्थिती पुन्हा उद्भवणार, हेच पीसीबीचं सर्वात मोठं टेन्शन आहे. पाकिस्तानी टीम वनडे वर्ल्ड कप 2023 साठी भारत दौऱ्यावर होती. त्यासोबतच (चॅम्पियंस ट्रॉफी) देखील आयसीसी टूर्नामेंट आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) नवे चेअरमन मोहसिन नकवी बीसीसीआय आणि आयसीसी यांची समजूत घालण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या प्रमोशनसाठी मदत मिळेल. नकवी BCCI ला हादेखील विश्वास देणार आहेत की, पाकिस्तानात निवडणूक पार पडली असून नवं सरकार आलं आहे. अशातच सुरक्षेसंदर्भातील कोणत्याही बाबतीत चिंता करण्याची गरज नाही.
संबंधित बातम्या:
मुंबई इंडियन्सच्या पराभवापेक्षा सारा तेंडुलकरची चर्चा; वानखेडे मैदानावरील फोटो होतोय व्हायरल