एक्स्प्लोर

ICC चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'या' दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या कुठं पाहता येणार हाय-व्होल्टेज सामना?

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान कधी भिडणार, प्रत्येक क्रिकेटप्रेमींना असा प्रश्न पडला आहे. 

ICC Champions Trophy 2025 India vs Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान कधी भिडणार, प्रत्येक क्रिकेटप्रेमींना असा प्रश्न पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता हायब्रीड मॉडेल अंतर्गत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करण्यास तयार आहे. अशा स्थितीत क्रिकेटप्रेमींच्या मनात सर्वात मोठी उत्सुकता आहे की, भारत-पाकिस्तान सामना कधी होणार आणि कुठे होणार? दोन्ही देश एकमेकांच्या यजमानपदाचा सामना खेळण्यास तयार नसल्यामुळे दोघांमधील सामना तटस्थ ठिकाणी होणार आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, 23 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानमध्ये हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. हा सामना कोलंबो किंवा दुबईत खेळवला जाणार आहे. मात्र, ते कुठे खेळले जाणार हे अद्याप निश्चित झालेले नाही?

दोन प्रतिस्पर्ध्यांमधील हा सामना कोलंबो किंवा दुबईत खेळवला जाईल, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. मात्र, याबाबत अद्याप आयसीसी किंवा पीसीबीने काहीही सांगितलेले नाही. याप्रकरणी दोघेही लवकरच निर्णय घेतील. नुकतीच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळण्यास मान्यता मिळाली आहे. ही स्पर्धा आशिया खंडातील दोन देशांमध्ये खेळवली जाईल, त्यापैकी बहुतांश सामने पाकिस्तानमध्ये खेळवले जातील तर भारताचे सामने कोलंबो किंवा यूएईमध्ये खेळवले जातील. 

दुसरीकडे, जर भारत उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात यशस्वी झाला तर, त्याचे सर्व सामने यूएई किंवा कोलंबोमध्ये खेळले जातील. चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यांचे प्रसारण स्टार स्पोर्ट्स करणार आहे, म्हणजे स्टार स्पोर्ट्स 1 एचडी/एसडी, स्टार स्पोर्ट्स 2 एचडी/एसडी आणि स्टार स्पोर्ट्स 3 इंग्लिश कॉमेंट्रीसह भारत आणि पाक सामना प्रसारित करतील.

टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताने पाकिस्तानचा केला होता पराभव 

याआधी टी-20 वर्ल्ड कपदरम्यान भारत-पाकिस्तान सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट ग्राऊंडवर झाला होता. भारताने हा सामना जिंकला होता. तुम्हाला सांगतो की, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. आयसीसीने अलीकडेच पुष्टी केली आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) लवकरच वेळापत्रक जाहीर करेल. याआधी, काही दिवसांपूर्वी, पीसीबीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासोबतच्या सामन्याचे प्रारूप वेळापत्रक जाहीर केले होते, ज्यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 3 मार्च रोजी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली होती चॅम्पियन्स ट्रॉफी

याआधी 2017 मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना झाला होता. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरली होती, पण टीम इंडियाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी पाकिस्तानने विजेतेपदावर कब्जा केला होता. भारताने शेवटचे 2013 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुन्हा एकदा त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया हे विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरली तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची भारताची ही दुसरी वेळ असेल.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार

व्हिडीओ

Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?
मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम लागू करणार, एकनाथ शिंदे यांचा शब्द
नाशिकमधील 8 हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती, एकनाथ शिंदे यांचा विकासकांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद 
ED Raid on I-PAC: पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
पश्चिम बंगालमध्ये राजकीय सल्लागार कंपनी 'आय-पीएसी'वर ईडीची धाड, महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
शरद पवार सिंह, अजित दादा वाघ, आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नाही; राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार
Embed widget