
आयसीसीच्या कसोटी संघात फक्त दोन भारतीय, रोहित-विराटला स्थान नाही, कमिन्सकडे नेतृत्व
ICC Test Team Of The Year 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने (ICC) 2023 वर्षाचा सर्वोत्कृष्ट कसोटी संघाची निवड केली आहे. या संघात फक्त दोन भारतीय खेळाडूंना (Team India) स्थान देण्यात आले आहे.

ICC Test Team Of The Year 2023 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने (ICC) 2023 वर्षाचा सर्वोत्कृष्ट कसोटी संघाची निवड केली आहे. या संघात फक्त दोन भारतीय खेळाडूंना (Team India) स्थान देण्यात आले आहे. आयसीसीने (ICC) या संघाची धुरा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्याकडे सोपवली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंना कसोटी संघात स्थान मिळाले नाही. कसोटी संघामध्ये पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला स्थान मिळवता आले नाही.
ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक खेळाडू -
आयसीसीने 2023 चा कसोटीचा सर्वोत्कृष्ट संघ निवडला आहे. यामध्ये सर्वाधिक ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पाच खेळाडूंनी कसोटी संघात स्थान पटकावले आहे. भारत आणि इंग्लंडच्या प्रत्येकी दोन दोन खेळाडूंना स्थान दिले आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड या संघातील प्रत्येकी एका खेळाडूला स्थान मिळाले आहे.
भारताचे दोन खेळाडू -
आयसीसीने निवडलेल्या कसोटी संघात फक्त दोन भारतीय खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. रवींद्र जाडेजा आणि आर. अश्विन या दोन खेळाडूंना आयसीसीच्या संघात स्थान मिळाले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यासारख्या अनुभवी खेळाडूंना स्थान मिळवता आले नाही. त्याशिवाय मोहम्मद सिराज यालाही स्थान मिळवता आले नाही.
ऑस्ट्रेलियाचे कोणते खेळाडू ?
आयसीसीने निवडलेल्या कसोटी संघात ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक पाच खेळाडू आहेत. कसोटी संघाची जबाबदारीही ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्याशिवाय सलामी फलंदाज उस्मान ख्वाजा, मिडिल ऑर्डर फलंदाज ट्रेविस हेड, विकेटकीपर एलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्क यांना स्थान मिळाले आहे. मार्नस लाबुशेन आणि स्टिव्ह स्मिथ यांना स्थान मिळाले नाही. दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, इंग्लंडचा जो रुट आणि स्टुअर्ट ब्रॉड आणि श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने याला संधी देण्यात आली आहे.
आयसीसी सर्वश्रेष्ठ टेस्ट टीम- उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, केन विलियमसन, जो रूट, ट्रेविस हेड, रवींद्र जडेजा, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिंस (कर्णधार), आर अश्विन, मिचेल स्टार्क आणि स्टुअर्ट ब्रॉड.
आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर 2023- रोहित शर्मा (कप्तान), शुभमन गिल, ट्रेविस हेड, विराट कोहली, डेरिल मिचेल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मार्को यॉन्सेन, एडम जंपा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.
आयसीसी 2023 बेस्ट टी20 टीम- यशस्वी जायसवाल, फिल साल्ट, निकोलस पूरन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), मार्क चॅपमैन, सिकंदर रजा, अल्पेश रामजानी, मार्क अडायर, रवि बिश्नोई, रिचर्ड नगारवा आणि अर्शदीप सिंह.
आणखी वाचा :
मोठी बातमी! 2023 वनडे टीमची ICCनं केली घोषणा, 6 भारतीयांना स्थान, पाकिस्तानचा एकही खेळाडू नाही
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
