ENG vs IND: विराट कोहलीच्या अनुपस्थितीनंतरही पुजारा अन् रहाणेचं कमबॅक कठीण, नेमकं कारण काय?
Virat Kohli Replacement : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच विराट कोहलीने (Virat Kohli) पहिल्या दोन सामन्यातून माघार घेतली.
Virat Kohli Replacement : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधीच विराट कोहलीने (Virat Kohli) पहिल्या दोन सामन्यातून (IND vs ENG Test Series) माघार घेतली आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या जागी (Virat Kohli Replacement) निवड समिती कुणाला संधी देणार? याची चर्चा सुरु झाली आहे. विराट कोहलीच्या जागी अजिंक्य रहाणे अथवा चेतेश्वर पुजार यांच्यापैकी एकाला संधी मिळणं शक्य आहे का? याबाबत जाणून घेऊयात...
इंग्लंडविरोधात सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यासाठी निवड समितीने भारताच्या 16 शिलेदारांची निवड केली. विराट कोहलीने माघार घेतल्यामुळे स्क्वाडमध्ये आता 15 खेळाडू राहतील. विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणाही झाली तर प्लेईंग 11 ची निवड सध्याच्या 15 खेळाडूमधूनच होईलच. त्यामुळे बीसीसीकडून विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणाही होण्याची शक्यता नाही. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत केएल राहुल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, त्याशिवाय श्रेयस अय्यर याचं संघातील स्थान निश्चित मानले जातेय.
जर विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणा होणार असेल तरीही पुजारा अथवा रहाणे यांना संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. बीसीसीआयकडून या दोन खेळाडूऐवजी भारत अ संघातील खेळाडूंना संधी देऊ शकते. रजत पाटील सर्वात मोठा दावेदार मानले जातेय.
अजिंक्य रहाणेचं कमबॅक कठीण का?
अजिंक्य रहाणे रणजी ट्रॉफीमध्ये यंदाच्या हंगामात फ्लॉप गेलाय. अजिंक्य रहाणेची बॅट शांतच राहिली आहे. मागील दोन सामन्यातील तीन डावात रहाणेला फक्त 16 धावा काढता आल्या आहेत. त्याला दोन वेळा खातेही उघडता आले नाही. अशा स्थितीमध्ये अजिंक्य राहणेला संधी मिळण्याची शक्यता कमीच दिसतेय. अजिंक्य रहाणे याने जुलै 2023 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला आहे.
चेतेश्वर पुजारा भन्नाट फॉर्मात, पण.....
चेतेश्वर पुजारा यांनी अखेरचा कसोटी सामना जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये खेळला होता. त्यानंतर विडिंज दौऱ्यातून त्याचा पत्ता कट झाला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही त्याला वगळण्यात आले. रणजी चषकामध्ये पुजाराने शानदार कामगिरी केली. त्याने तीन सामन्यातील पाच डावात 444 धावा चोपल्या आहेत. एक द्विशतकही ठोकले आहे. झारखंड सारख्या कमकुवत संघाविरोधात त्याने द्विशतक ठोकलेय. पण दोन सामन्यासाठी पुजाराला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
चेतेश्वर पुजारा देशांतर्गत क्रिकेटमध्ये फॉर्मात आहे. पुजारा लयीत दिसतोय, पण बीसीसीआय त्याला इंग्लंडविरोधातील अखेरच्या तीन सामन्याआधी आणखी थोडा वेळ देऊ शकते. म्हणजे पुजाराला आणखी काही रणजी सामन्यात खेळावं लागेल. पुजाराने रणजी सामन्यात आणखी काही चांगल्या खेळी केल्या तर त्याला अखेरच्या तीन सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. विराट कोहलीची रिप्लेसमेंट म्हणून पुजाराला संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. जरी संधी मिळाली तर प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमीच आहे.
आणखी वाचा :
मोठी बातमी! 2023 वनडे टीमची ICCनं केली घोषणा, 6 भारतीयांना स्थान, पाकिस्तानचा एकही खेळाडू नाही