Pakistan Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीत तोंड दाखवायला जागा ठेवली नाही, पण तरी पाकिस्तानच्या संघावर पैशांचा पाऊस! जय शाहांच्या 'त्या' निर्णयानं मिळणार कोट्यवधी रुपये
चॅम्पियन्स ट्रॉफीत गतविजेत्यांची विजयाची पाटी कोरी, पावसानं शेवटची संधीही हिरावली

How much prize money Pakistan Champions Trophy : 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील यजमान पाकिस्तानचा प्रवास संपला आहे. संघाला एकही सामना जिंकता आला नाही. पाकिस्तानचा बांगलादेश विरुद्धचा शेवटचा साखळी सामना पावसामुळे रद्द झाला. पण, स्पर्धेतून बाहेर पडूनही पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. आता तुम्ही असा विचार करत असाल की, जेव्हा पाकिस्तान संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे, तेव्हा त्यांना करोडो रुपये कसे मिळतील?
पाकिस्तान स्पर्धेत सातव्या किंवा आठव्या स्थानावर असेल.
The ICC #ChampionsTrophy match between Pakistan and Bangladesh is abandoned without a ball bowled 🌧️#PAKvBAN pic.twitter.com/h7uxOhYb9J
— Pakistan Cricket (@TheRealPCB) February 27, 2025
खरं तर, पाकिस्तान संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप अ च्या पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर राहिला. अशा परिस्थितीत, पाकिस्तान संघ या स्पर्धेत किमान सातव्या किंवा आठव्या स्थानावर असेल. ग्रुप बी चे दोन सामने अजून बाकी आहेत. अशा परिस्थितीत, रिझवानचा संघ स्पर्धेचा शेवट जास्तीत जास्त सातव्या स्थानावर किंवा आठव्या स्थानावर करेल. पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर असूनही, यजमान संघाला आयसीसीकडून कोट्यवधी रुपये मिळतील. आयसीसीच्या नियमांनुसार, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला काही बक्षीस रक्कम मिळेल.
आयसीसीकडून पाकिस्तानला इतके कोटी मिळणार?
पाकिस्तानला आयसीसीकडून बक्षीस रक्कम म्हणून सुमारे 2 कोटी 37 लाख रुपये मिळतील. यापैकी सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर असलेल्या संघाला 1.4 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 1 कोटी 22 लाख रुपये मिळणार होते, त्यामुळे पाकिस्तानला ते पैसे मिळतील. त्याच वेळी, सामना जिंकण्यासाठी 34000 अमेरिकन डॉलर्स देण्यात येणार होते. पण या स्पर्धेत पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही. पण, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना रद्द करण्यात आला आणि $34,000 ची बक्षीस रक्कम दोन्ही संघांमध्ये विभागली जाईल. दोन्ही संघांना 17 हजार डॉलर्सचा वाटा मिळेल, जे सुमारे 15 लाख रुपये आहे, ते पैसेही पाकिस्तानला मिळतील.
याशिवाय, यावेळी आयसीसीने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांना 1 लाख 25 हजार डॉलर्स स्वतंत्रपणे देण्याची घोषणा केली होती. अशाप्रकारे, पाकिस्तानला एकूण 2 कोटी 37 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळतील. पाकिस्तानलाही या स्पर्धेच्या आयोजनासाठी पैसे मिळतील, परंतु ते या बक्षीस रकमेपासून वेगळे असेल.
हे ही वाचा -





















