Ind vs Eng 5th Test : गंभीरला भिडला, शेवटच्या दिवशी 'ती' चालही खेळली; पण शेवटी त्याचीच चूक नडली, सामना कसा पलटला? मोठं कारण समोर
पाचव्या आणि अखेरच्या दिवशी ओव्हल कसोटी सुरू होण्यापूर्वी इंग्लंडला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं आणि त्यामागचं मुख्य कारण होतं हेव्ही रोलर.

England vs India 5th Test Update : पाचव्या आणि अखेरच्या दिवशी ओव्हल कसोटी सुरू होण्यापूर्वी इंग्लंडला विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, त्यामागचं मुख्य कारण होतं हेव्हीरोलर. असं भाकीत करण्यात आलं होतं की, पिचवर हेव्ही रोलर फिरवल्यामुळे विकेट सपाट होईल आणि इंग्लंडला उरलेले केवळ 35 धावांचे लक्ष्य गाठायला 35 चेंडूंचीही गरज भासणार नाही, पण झालं नेमकं उलटंच. भारताचे मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी एकत्रितपणे केवळ 29 धावांच्या आत उरलेली चारही विकेट घेतल्या आणि भारताला थरारक विजय मिळवून दिला.
पिच क्युरेटर ली फोर्टिसने रोलर चालवला तरी इंग्लंडचा पराभव झाला....
या सामन्याआधी ओव्हलच्या खेळपट्टीवरून मोठा वाद झाला होता. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि पिच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. गंभीर सामन्यापूर्वी पिच पाहण्यासाठी गेला होता, तेव्हा क्युरेटर आणि गंभीर भिडले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. शेवटच्या दिवशी सामना जिंकण्यासाठी ली फोर्टिसनं स्वत: हेव्ही रोलर चालवला होता. जो ग्राफ स्टाफकडून रोलर चालवण्यात येतो. पण पाचव्या दिवसाचा खेळ सुरु होण्याआधी ली फोर्टिस यांनी स्वत: हेव्ही रोलर चालवला, पण तरी त्यांचा पराभव झाला.
All heart. All hustle. All 𝘋𝘩𝘢𝘢𝘬𝘢𝘥 💪
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 4, 2025
A fightback that will go down in Indian cricket history ✨#SonySportsNetwork #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/bvXrmN5WAL
हॅरी ब्रूकने पराभवामागचं कारण केलं स्पष्ट...
इंग्लंडकडून शतक झळकावणाऱ्या हॅरी ब्रूकने आता या पराभवामागचं कारण स्पष्ट केलं आहे. तो म्हणाला की, "मला वाटलं होतं की हेव्ही रोलर फिरवल्यानंतर पिच पूर्णपणे सपाट होईल, पण वातावरण ढगाळ असल्यामुळे चेंडू फिरत होता. क्रिस वोक्स (जो की दुखापतीने त्रस्त होता) मैदानात उतरला, पण दुर्दैवाने आम्ही सामना जिंकू शकलो नाही."
ब्रूकला भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी इंग्लंडच्या संघातून ‘प्लेयर ऑफ द सिरीज’ म्हणून निवडलं. त्याने सिराजच्या कामगिरीचंही भरभरून कौतुक केलं. तो म्हणाला की, "मला खरंच वाटलं होतं की सामना सहज जिंकू, पण सिराजने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, त्याला यश मिळालंच पाहिजे होतं. त्यानं संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केली आणि शेवटही कमाल केला."
इंग्लंडला अखेरच्या दिवशी केवळ 35 धावांची गरज होती आणि 4 विकेट शिल्लक होत्या. ब्रूक म्हणला की, "जेव्हा मी आणि जो रूट फलंदाजी करत होतो, तेव्हा आमची खेळी चांगली सुरू होती. पण या मालिकेत खूप चढउतार पाहायला मिळाले आणि शेवटही तसाच झाला. मी सामना लवकर संपवायचा विचार करत होतो. मालिकेत मी चांगली फलंदाजी केली, पण विजय मिळवता न आल्याचं दुःख राहील. ही एक अतिशय स्पर्धात्मक मालिका होती आणि आम्ही एक टक्का कसरही ठेवली नाही."
बेन स्टोक्स काय म्हणाला?
दरम्यान, खांद्याच्या दुखापतीमुळे ओव्हल टेस्ट खेळू न शकलेला इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने देखील भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, "ही मालिका माझ्यासाठी खास होती. अशा पाच सामन्यांचा अनुभव खूपच वेगळा असतो. 2023 मध्ये घरच्या मैदानावर झालेल्या अॅशेस मालिकेची आठवण झाली. तेदेखील खास क्षण होते, ज्या मालिकेचा मी भाग होतो." या संपूर्ण मालिकेने दोन्ही संघांनी दिलेलं 100% आणि शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिलेला रोमांच, क्रिकेटप्रेमींसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव ठरला.





















