एक्स्प्लोर

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा सामना इंदौरमध्ये, कशी आहे खेळपट्टी, संभाव्य प्लेईंग 11

Holkar Stadium Pitch Report :  मोहाली वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तीन सामन्याच्या मालिकेत १-० च्या फरकाने आघाडी घेतली आहे.

Holkar Stadium Pitch Report :  मोहाली वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत तीन सामन्याच्या मालिकेत १-० च्या फरकाने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना इंदौर येथील होळकर स्टेडिअवर होणार आहे. हा सामना जिंकून मालिका विजयासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल तर दुसरीकडे कांगरु पलटवार करण्यास तयार आहेत. रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक सामना होईल. इंदौरमध्ये रविवारी हवामान कसे असेल... त्याशिवाय प्लेईंग ११ मध्ये कुणाला कुणाला स्थान मिळू शकते. 

इंदोरच्या स्टेडिअमवर फलंदाजांना सहज धावा काढता येतील. या मैदानावरील अखेरच्या वनडे सामन्यात भारताने ३८५ धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतके ठोकली होती. रविवारी होणाऱ्या सामन्याकडेही सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

वेगवान गोलंदाजाला मदत मिळणार ?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी इंदौरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजाला मदत मिळू शकते.  रविवारी होणाऱ्या सामन्यात सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाज फलंदाजाना अडचणीत टाकू शकतात.

दुसऱ्या वनडेत मुसळधार पावसाचा अंदाज - 
 
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ सप्टेंबर रोजी इंदौरध्ये ढगाळ वातावरण असेल. सायंकाळनंतरही इंदौरमध्ये पावसाची शक्यता आहे. इंदौरमध्येही सकाळी वादळ येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी मेघगर्जनेची शक्यता असून पाऊसही पडू शकतो. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, जे दिवस पुढे जात असताना हळूहळू ते 24 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

भारताची संभाव्य प्लेईंग  -

शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर / कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलियाची संभाव्य  प्लेइंग 11-

डेविड वार्नर, मिशेल मार्श, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, कैमरून ग्रीन, जोश इंगलिस (विकेटकीपर), मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट आणि एडम जम्पा

सामन्याची वेळ काय ?

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 पासून खेळले जातील. विश्वचषकापूर्वी भारत-ऑस्ट्रेलिया मालिका खूप महत्त्वाची मानली जाते.

कुठे पाहाल सामना -

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे सामने जिओ सिनेमावर पाहता येतील. जिओ सिनेमावर प्रेक्षपण एकदम मोफत असेल. Sports 18 या टिव्ही चॅनलवर सामन्याचा आनंद घेता येईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्याचा लेखाजोखा -

मोहाली येथील एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटने पराभव केला. ऑस्ट्रेलियाने दिलेले 277 धावांचे आव्हान भारताने आठ चेंडू आणि पाच विकेट राखून सहज पार केला. शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि कर्णधार केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली. या विजयासह भारताने वनडे क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावलेय. भारतीय संघ तिन्ही फॉर्मेटमध्ये पहिल्या स्थानावर विराजमान आहे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Nashik : नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय

व्हिडीओ

Thackeray Brohters Yuti : शिवसेना-मनसे युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, राज ठाकरेंची घोषणा
Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC :शिवसेना-मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करतोय, ठाकरेंची घोषणा
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Video: इन्स्टावर ओळख, तरुण कारमधून आला, तरुणीनं प्रपोजल नाकारताच भर रस्त्यात कपडे फाडून बेदम मारहाण
Nashik : नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
नाशिकचा तिढा सुटला! भाजपचा 25 ते 30 जागांचा प्रस्ताव शिंदेंच्या शिवसेनेला मान्य, सूत्रांची माहिती
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
'कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं'वरून सोशल मीडियात जुंपली! आरजे सुमितच्या 'त्या' व्हिडिओवर सतेज पाटलांनी कमेंट करताच कृष्णराज महाडिकांची सुद्धा कमेंट
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
नगरपरिषद अधिनियमांत सुधारणा, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चार महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
मोठी बातमी! मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका
Gold Silver Rate : चांदीनं सव्वा दोन लाखांचा टप्पा गाठला, सोने दराचा नवा उच्चांक, जाणून घ्या सोने-चांदीचे नवे दर
सोने चांदीची दरवाढीची एक्सप्रेस सुस्साट, चांदीकडून सव्वा दोन लाखांचा टप्पा पार, जाणून घ्या नवे दर
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं
बीडमध्ये तमाशाच्या कार्यक्रमात हाणामारी; लाठ्या-काठ्यांनी मारहाण, ढोलकीनंही बदडलं
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
लाडक्या बहिणींकडे ई- केवायसीसाठी शेवटचा आठवडा राहिला, लाडक्या बहिणींना नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
Embed widget