Haris Rauf : विराट कोहलीने रडकुंडी आणलेला पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफ झाला सिक्युरिटी गार्ड? काय आहे सत्य
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ हा त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखला जातो, मात्र आता सध्या तो सोशल मीडियावर एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.
Haris Rauf Viral Photo : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ हा त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी ओळखला जातो, मात्र आता सध्या तो सोशल मीडियावर एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. हारिस रौफ एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो पोलिसांच्या गणवेशात दिसत आहे. पण यूजर्स सोशल मीडियावर त्याला सिक्युरिटी गार्ड म्हणत आहे. तर काय आहे या व्हायरल फोटोमागील सत्य जाणून घेऊया...
सोशल मीडियावर व्हायरल या फोटोमध्ये पाकिस्ताने पोलीस अधिकारी हरिसला त्याची जबाबदारी देत असल्याचे दिसत आहे. हरिस आणि त्याच्या सहकारी पोलीस अधिकाऱ्यांनी आकाश निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. पण आता या फोटोवर भारतीय यूजर्स सोशल मीडियावर कमेंट वेगवेगळ्या करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, लाहोर क्रिकेट स्टेडियमचा सिक्युरिटी गार्ड म्हणून हरिस रौफ यांची नियुक्ती केली. तर आणखी एका युजरने लिहिले की, पाकिस्तानमधील डीएसपीचा पगारही भारताच्या सुरक्षा रक्षकापेक्षा कमी असेल, त्यामुळे पगार जसा तसा ड्रेस.
Haris Rauf appointed as Security Guard of Lahore Cricket Stadium. pic.twitter.com/2a2fzRPXp6
— mufaddla parody (@mufaddl_parody) September 2, 2024
व्हायरल फोटोमागील काय आहे सत्य?
खरंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज हरिस रौफ पोलिसात दाखल झाला आहे. इस्लामाबाद पोलिसांनी त्यांची डीएसपी म्हणून नियुक्ती केली. खुद्द हरिसने आपल्या ट्विटरवर पोस्ट टाकून ही माहिती दिली होती. त्याला डीएसपी बनवण्याचा सोहळा इस्लामाबादमध्ये पार पडला. या सोहळ्यात हरिस पोलिसांच्या गणवेशात दिसत आहे.
I’m truly honoured to be appointed as a goodwill ambassador of @ICT_Police and an even greater honour to be able to wear this uniform as our heroes who lay their lives in the line of duty ! @akbarnasirkhan @farharkazmii @Ayab_Ahmed pic.twitter.com/gh6A2H01sb
— Haris Rauf (@HarisRauf14) March 28, 2023
मात्र, हा मान मिळवणारा हारिस हा पहिला पाकिस्तानी खेळाडू नाही. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा आणखी एक वेगवान गोलंदाज नसीम शाह यालाही हा सन्मान मिळाला होता. नसीम शाह ही डीएसपी देखील आहेत, त्याला क्वेटाच्या बलुचिस्तान पोलिसांनी गुडविल ॲम्बेसेडर बनवले आहे. या दोघांना पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीचे भविष्य मानले जाते.
हरिस रौफच्या चेंडूवर विराट कोहलीचा षटकार
2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने हारिस रौफच्या चेंडूवर अविश्वसनीय शॉट मारला होता. जो जगभर व्हायरल झाला होता. या शॉटनंतर गोलंदाजासह विरोधी संघातील खेळाडूही हैराण झाले. खरंतर, हरिस रौफच्या वेगवान चेंडूवर विराट कोहलीने मागच्या पायावर जाऊन सरळ पुढच्या बाजूने षटकार मारला. त्याचवेळी आयसीसीने विराट कोहलीच्या शॉटला शॉट ऑफ द सेंच्युरी देऊन सन्मानित केले होते.
View this post on Instagram
हरिस रौफची कारकीर्द
30 वर्षीय हरिस रौफने 2020 मध्ये पाकिस्तानकडून पदार्पण केले. तेव्हापासून, तो त्याच्या राष्ट्रीय संघासाठी एक कसोटी, 37 एकदिवसीय आणि 66 टी-20 खेळला आहे. हारिस रौफ हा त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो.