Jasprit bumrah ruled out of T20 World Cup 2022 : भारतीय क्रिकेट संघ आगामी  टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. पण स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकातूनबाहेर झाला आहे. बुमराह विश्वचषकाला मुकण्याची शक्यता असल्याच्या बऱ्यात बातम्या येत होत्या, पण आत बीसीसीआयनं (BCCI) अधिकृतरित्या हे जाहीर केलं. ज्यानंतर भारतीय फॅन्स नाराज झाले असून क्रिकेटर हार्दीक पांड्यानेही बुमराहच्या विश्वचषकातून बाहेर होण्याबाबत ट्वीट कर आपली प्रतिक्रिया दिली आहे.


हार्दीकने केलेल्या ट्वीटमध्ये त्याने लिहिलं आहे की, ''जस्सी (Jasprit Bumrah) तू नेहमीप्रमाणे जोरदार पुनरागमन कर.'' या ट्वीटमध्ये हार्दीकने एक मुकुट आणि दोन हार्ट इमोजी देखील जोडले आहेत. तसंच ट्वीटमध्ये सुरुवातीला हार्दीकने सिंहाचा इमोजी देखील जोडला आहे


दुखापतीमुळे बुमराह विश्वचषकाबाहेर




मागील काही महिने बुमराह दुखापतीमुळे तसंच विश्रांती घेण्यासाठी संघात आत-बाहेर असल्याचं दिसून येत आहे. आता आशिया कपपूर्वी महिन्यात बुमराह इंग्लंड दौऱ्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर आशिया कप सामन्यांनाही मुकला. त्यानंतर विश्वचषकाची तयारी म्हणून बुमराहला संघात पुन्हा बोलवण्यात आलं त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचे दोन सामने तो खेळला पण आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धही तो दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. दरम्यान बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी योग्य वेळ दिला न गेल्याने तो आता पुढील काही महिने सामने खेळू शकणार नाही असं दिसून येत होत, ज्यानंतर आता तो संपूर्ण टी20 विश्वचषकाला मुकणार हे समोर आलं आहे. 


बुमराहला पर्याय कोणाचा?


टी-20 विश्वचषकातील राखीव खेळाडूंमध्ये दीपक चाहर आणि मोहम्मद शामी दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे, संघातील महत्वाचा खेळाडूला दुखापत झाल्यास राखीव खेळाडूला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवलं जातं. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत दीपक चाहरनं चांगली गोलंदाजी केलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात दीपक चाहरनं चार षटकात 24 धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. परंतु, जसप्रीत बुमराहऐवजी कोणाला भारतीय संघात संधी मिळेल? हा प्रश्न उपस्थित होत आहे. दीपक चाहर, मोहम्मद शामी किंवा अन्य कोण? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.


हे देखील वाचा -