Surykumar Yadav T20 I Record : भारतीय संघात सध्या फॅन्सचा सर्वात लाडका असणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने एक भीमपराक्रम भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) दुसऱ्या टी20 मध्ये केला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत म्हणजेच 543 चेंडूत 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.  

 

इतर खेळाडूंच्या तुलनेत काहीसं उशीरा टीम इंडियाचं तिकीट मिळालेला सूर्यकुमार सलामीच्या सामन्यापासून कमाल फॉर्ममध्ये आहे. आज त्याने 1000 आंतरराष्ट्रीय टी20 धावा पूर्ण केल्या आहेत. 31 डावांत त्याने ही कामगिरी केली असून सर्वात जलदगतीने 1000 धावा पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत तो सातव्या स्थानावर तर भारतीयांमध्ये तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पण सर्वात कमी चेंडूत ही कामगिरी करणाऱ्यांमध्ये तो अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. 573 चेंडूत 1000 धावा पूर्ण करत त्याने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलचा 604 चेंडूत 1000 धाव ठोकण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. सूर्याने आजच्या खेळीत 22 चेंडूत 5 षटकार आणि 5 चौकार ठोकत 61 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत सूर्यकुमार सर्वात जलदगतीनं अर्धशतक ठोकणाऱ्या भारतीयांच्या यादीत केएल राहुलसोबत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. या यादीत युवराज सिंह 12 चेंडूत अर्धशतक पूर्ण करत पहिल्या स्थानावर आहे. 

 




भारतानं उभारला 237 धावांचा डोंगर


सूर्याच्या या खेळीसोबतच इतर फलंदाजांनीही तुफान खेळी करत भारताची धावसंख्या 237 पर्यंत नेली. यावेळी सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी तडाखेबाज फलंदाजी करत अगदी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली. दरम्यान रोहित 43 धावा करुन तर केएल राहुल अर्धशतक पूर्ण करुन  57 धावांवर बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमारच्या 61 धावांसोबत विराट कोहली 49 धावांवर नाबाद राहिला. कार्तिकनेही नाबाद 17 धावा करत भारताची धावसंख्या 237 पर्यंत पोहोचवली.



 

हे देखील वाचा -